Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Shopping > फक्त ३ सेकंदात ओळखा साडीची अस्सल सिल्कची की सिंथेटिक? महाग हातमाग सिल्क साडी घेताना ‘एवढंच’ करा

फक्त ३ सेकंदात ओळखा साडीची अस्सल सिल्कची की सिंथेटिक? महाग हातमाग सिल्क साडी घेताना ‘एवढंच’ करा

How to Identify Real Silk Saree and Fake Silk Saree?: लग्नसराईच्या निमित्ताने सिल्कच्या साड्यांची खरेदी करणार असाल तर पुढे सांगितलेल्या काही टिप्स लक्षात ठेवाच...(4 tips to identify the difference between real silk saree and fake silk saree)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2026 17:11 IST2026-02-14T09:40:15+5:302026-02-14T17:11:33+5:30

How to Identify Real Silk Saree and Fake Silk Saree?: लग्नसराईच्या निमित्ताने सिल्कच्या साड्यांची खरेदी करणार असाल तर पुढे सांगितलेल्या काही टिप्स लक्षात ठेवाच...(4 tips to identify the difference between real silk saree and fake silk saree)

how to identify real silk saree and fake silk saree, 4 tips to identify the difference between real silk saree and fake silk saree | फक्त ३ सेकंदात ओळखा साडीची अस्सल सिल्कची की सिंथेटिक? महाग हातमाग सिल्क साडी घेताना ‘एवढंच’ करा

फक्त ३ सेकंदात ओळखा साडीची अस्सल सिल्कची की सिंथेटिक? महाग हातमाग सिल्क साडी घेताना ‘एवढंच’ करा

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांची वेगवेगळ्या साड्यांची खरेदी सुरू झालेली असणार. आता सिल्कची महागडी साडी आपण अशा निमित्तानेच घेतो. त्यामुळे साडी एकदा आवडली की मग हवा तेवढा पैसा खर्च करतो आणि ती साडी घेतो. पण नेमकी इथेच आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. कारण हल्ली सिल्कच्या नावाखाली काहीही विकले जाते आणि ग्राहकांकडून भरमसाठ पैसे उकळले जातात (How to Identify Real Silk Saree and Fake Silk Saree?). म्हणूनच अस्सल सिल्कची पारख करायची असेल तर साडी खरेदी करताना पुढे सांगितलेल्या काही टिप्स लक्षात ठेवा.(4 tips to identify the difference between real silk saree and fake silk saree) 

 

अस्सल सिल्कची साडी कशी ओळखायची?

१. तुम्हाला जी साडी घ्यायची आहे ती थोडी उकलून घ्या. त्यानंतर तिचा थोडासा भाग गोळा करून हातात घ्या आणि ३ सेकंदासाठी दाबून धरा. जर त्यानंतर त्या भागामध्ये बारीक सुरकुत्या दिसायला लागल्या तर ते खरे सिल्क आहे. इतर फॅब्रिकला लगेचच अशा बारीक सुरकुत्या दिसत नाहीत.

नव्या नवरीसाठी सुंदर स्टायलिश ८ जोडवी, कमी वजन पण दिसतात ठसठशीत, पाहा डिझाईन्स..

२. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिल्कची साडी दोन्ही हातांनी पकडा. त्यानंतर त्या साडीचे दोन भाग एकमेकांवर घासा. ३ ते ५ सेकंद हे करा. असं केल्यानंतर जर घासलेल्या ठिकाणी साडी थोडी उबदार लागली तर ते अस्सल सिल्क आहे हे लक्षात येतं. जे नकली सिल्क असतं ते असं उबदार होत नाही.

 

हे देखील लक्षात ठेवा

१. सिल्कची साडी नेहमीच वजनाने हलकी असते. मुळात वजनाने हलकं असणं हेच सिल्क साड्यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे साडी खरेदी करण्यापुर्वी तिचं वजनही तपासून पाहा.

सकाळी चहा पिण्याच्या आधी 'हे' प्या - भराभर वजन उतरून पोट -कंबर होईल सपाट

२. सिल्क साडीचा पदर मागच्या आणि पुढच्या बाजुने सारखाच दिसतो. पण ज्या साड्या नकली असतात त्या साड्यांच्या पदराच्या मागच्या भागात सगळे धागे दिसतात. आणि पुढच्या बाजुने तसेच मागच्या बाजुने पदराचा रंग वेगळा दिसतो. 


 

Web Title : असली सिल्क साड़ी की पहचान 3 सेकंड में: खरीदने से पहले जांचें!

Web Summary : शादी के मौसम के साथ, असली रेशम की साड़ियों की पहचान करने के लिए त्वरित सुझाव जानें। उच्च कीमतों पर बेचे जाने वाले नकली कपड़ों से धोखा खाने से बचने के लिए झुर्रियों, रगड़ने पर गर्मी, वजन और बुनाई की समानता की जांच करें।

Web Title : Identify Real Silk Saree in 3 Seconds: Pre-Purchase Checks!

Web Summary : With the wedding season underway, learn quick tips to identify real silk sarees. Check for wrinkles, warmth when rubbed, weight, and evenness of the weave to avoid being cheated by fake fabrics sold at high prices.