नवरात्र, दसरा, दिवाळी असे सणावाराचे दिवस आता सुरू होतच आहेत. दिवाळीनंतर लगेचच लग्नसराईही येतेच. आता सणवार आणि लग्नसराई यानिमित्ताने हमखास महागाच्या सिल्क साड्या मोठ्या हौशीने खरेदी केल्या जातात. आता जर मराठी महिला असतील तर त्या हमखास पैठणी घेतातच. पैठणीच्या किमती आता खूप वाढल्या असून ओरिजनल पैठणी घेण्यासाठी किमान १० हजार तरी मोजावे लागतात. एवढे पैसे देऊन आपण घेतो आहोत ती पैठणी खरोखरंच सिल्कची, खरी आहे ना, दुकानदार आपल्या माथी डुप्लिकेट पैठणी तर मारत नाही ना याची शाहनिशा प्रत्येक ग्राहकाने करणं गरजेचं आहे (how to identify original paithani and duplicate paithani?). त्यासाठी अस्सल पैठणीची ओळख सांगणाऱ्या या काही खाणाखुणा पक्क्या लक्षात ठेवा...(4 tips to identify duplicate paithani)
डुप्लिकेट पैठणी आणि अस्सल पैठणी कशी ओळखायची?
आपल्याला माहितीच आहे की पैठणीची ओळख तिच्या काठांवरून आणि पदरावरून होत असते. त्यामुळे पैठणीचा खरेपणा तपासण्यासाठी तिचा पदर लक्षपुर्वक पाहा. जी पैठणी अस्सल असते तिच्या पदराचा समोरचा भाग आणि उलटा भाग जवळपास सारखाच दिसतो.
पदरावर जे डिझाईन असतं ते जेव्हा तुम्ही उलट्या बाजुने पाहता तेव्हा त्याचे अजिबात धागे निसटलेले किंवा सुटलेले दिसत नाहीत. ते देखील समोरून दिसणाऱ्या डिझाईन इतकेच सुबक वाटते.
पैठणीच्या पदरावर असणाऱ्या डिझाईनचा पुढच्या बाजुने जो रंग असतो, तोच रंग मागच्या बाजुनेही असतो. ज्या पैठणी डुप्लिकेट असतात त्यांच्यामध्ये पदराच्या मागच्या बाजुने लाल, हिरवा, केशरा असा जवळपास एखादाच रंग खूप जास्त प्रमाणात दिसतो.
चुकीच्या पद्धतीने दही लावून तुम्ही त्याची पौष्टिकता तर घालवत नाही ना? बघा ४ महत्त्वाच्या टिप्स
पैठणीचा धागा जर तुम्ही जाळून पाहिला तर त्या रेशीम धाग्याची पुर्णपणे राख होते. याउलट डुप्लिकेट पैठणीचा धागा जाळल्यावर प्लास्टिक जळाल्याचा वास येतो आणि जळाल्यानंतर त्याची गोळी किंवा काडीसारखी तार तयार होते.