Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Shopping > ५ मिनिटांत उभारा सुंदर गुढी-पाहा १ युक्ती-गुढीला साडी नेसवणं-काठी उभी करणं होईल एकदम सोपं..

५ मिनिटांत उभारा सुंदर गुढी-पाहा १ युक्ती-गुढीला साडी नेसवणं-काठी उभी करणं होईल एकदम सोपं..

Gudhi Padva 2026: गुढीपाडव्यानिमित्त सध्या बाजारात आणि ऑनलाईन शॉपिंग साईटवरही वेगवेगळ्या वस्तू मिळत आहेत.. त्या एकदा नक्कीच बघा...(shopping tips for Gudhi Padva stand)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2026 15:58 IST2026-03-07T12:46:00+5:302026-03-07T15:58:48+5:30

Gudhi Padva 2026: गुढीपाडव्यानिमित्त सध्या बाजारात आणि ऑनलाईन शॉपिंग साईटवरही वेगवेगळ्या वस्तू मिळत आहेत.. त्या एकदा नक्कीच बघा...(shopping tips for Gudhi Padva stand)

gudhi padva 2026, stand for gudhi, shopping tips for gudhi padva stand  | ५ मिनिटांत उभारा सुंदर गुढी-पाहा १ युक्ती-गुढीला साडी नेसवणं-काठी उभी करणं होईल एकदम सोपं..

५ मिनिटांत उभारा सुंदर गुढी-पाहा १ युक्ती-गुढीला साडी नेसवणं-काठी उभी करणं होईल एकदम सोपं..

होळीचा सण झाला की मग सुरू होते गुढीपाडव्याची तयारी (Gudhi Padva 2026). पुर्वी घरात बरीच माणसं असायची. त्यामुळे गुढीसाठी काठी बघणं, तिला साडी नेसवणं, गुढी उभारणं ही कामं अगदी विनासायास होऊन जायची. पण आता मात्र न्युक्लिअर कुटूंबामध्ये ही सगळी कामं मुख्यत: घरातल्या महिलांकडे येतात. त्यात गुढीपाडव्याचा स्वयंपाकही असतो. काही जणींना तर ऑफिसही असतं. हे सगळं सांभाळताना मग गुढी उभारणं खूप किचकट आणि वेळखाऊ वाटायला लागतं. म्हणूनच त्याला पर्याय म्हणून आता गुढी उभी करण्याचं स्टॅण्ड बाजारात मिळायला लागलं आहे. हे स्टॅण्ड जर तुम्ही आणलं तर अवघ्या ५ मिनिटांत कोणतीही पुर्व तयारी न करता तुम्ही गुढी उभी करू शकाल...(shopping tips for Gudhi Padva stand)

 

गुढी उभारण्याचं स्टॅण्ड

१. अशा पद्धतीचं एक स्टॅण्ड ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतं. गुढी उभी करण्याच्या साहित्याचा हा सगळा सेटच आहे. यामध्ये काठी, ती उभी करण्यासाठीचं स्टॅण्ड, तांब्याचा कलश, गुढीची साडी, आर्टिफिशियल झेंडूच्या फुलांचा हार असं सगळं मिळतं.

थुलथुलीत शरीर बदलेल रूप होईल सडपातळ- 'या' पद्धतीने रोज ब्लॅक कॉफी प्या, पाहा तुमचा मेकओव्हर

हे सगळं साहित्य तुम्ही जसंच्यातसं पुढच्या वर्षीही वापरू शकता. त्यामुळे सध्या थोडी जास्त किंमत मोजावी लागली तरी हा सेट तुमच्याकडे कायमसाठी राहू शकतो. त्यामुळे १७०० रुपयांना असला तरी वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून तो घ्यायला हरकत नाही.

Click To Buy:

https://amzn.to/4rUfJ4h


२. अशा पद्धतीचं आणखी एक स्टॅण्ड मिळत आहे. तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरही ते मिळू शकतं. बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की गुढीची काठी कुठे बांधायची..

८ दिवस टिकणारा टोमॅटोचा झणझणीत ठेचा, चटकन होणाऱ्या चविष्ट पदार्थाची सोपी रेसिपी

कारण तिला चांगला बेस हवा असतो. अशावेळी या स्टॅण्डची चांगली मदत होऊ शकते. यामध्ये तुमच्याकडे असणाऱ्या गुढीची काठी खोचली की ती चांगली पक्की उभी राहाते.

 

Web Title : आसान गुड़ी पड़वा: स्टैंड से 5 मिनट में करें पारंपरिक स्थापना

Web Summary : गुड़ी पड़वा के लिए गुड़ी स्थापित करना अब आसानी से उपलब्ध स्टैंड से आसान हो गया है। ये स्टैंड, ऑनलाइन उपलब्ध हैं, जिसमें छड़ी, साड़ी और कलश जैसी सभी आवश्यक चीजें शामिल हैं, जो आधुनिक परिवारों के लिए प्रक्रिया को सरल बनाते हैं। एक बार का निवेश एक सुविधाजनक समाधान प्रदान करता है।

Web Title : Easy Gudhi Padwa: Stand simplifies traditional setup in just 5 minutes.

Web Summary : Setting up Gudhi for Gudhi Padwa becomes easy with readily available stands. These stands, available online, include all essentials like the stick, saree, and Kalash, simplifying the process for modern families. A one-time investment offers a convenient solution.