Join us

गणपती बाप्पांच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची पूर्ण यादी! आयत्यावेळी होणार नाही गडबड - पूजा होईल मंगलमय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2025 18:58 IST

Ganpati Puja Preparation : Ganpati Pooja Samagri List : Ganesh Chaturthi Puja List : Ganesh Pujan Samagri List : गणपती पूजेसाठी लागणाऱ्या आवश्यक आणि पारंपरिक साहित्याची यादी...

आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन आता अवघ्या काही दिवसांवर आले आहे. आत्तापर्यंत प्रत्येक घरोघरी गौराई आणि गणपती बाप्पांच्या आगमनाची अगदी जय्यत तयारी सुरु झाली असेल. गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्सव हा प्रत्येक घरात आनंद, भक्ती आणि उत्साहाने साजरा (Ganpati Puja Preparation) केला जातो. गणेश चतुर्थीला मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पांची मूर्ती घरोघरी आणून तिची मनोभावे पूजाअर्चा केली जाते. या खास (Ganpati Pooja Samagri List) सणाला सजावट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजाविधी यासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करणे हे एक महत्त्वाचे काम असते(Ganesh Chaturthi Puja List)

गणेशाच्या स्वागताची तयारी करताना कोणतीही गोष्ट कमी पडू नये, यासाठी पूजेच्या साहित्याची योग्य यादी असणे आवश्यक असते. नैवेद्यापासून आरतीपर्यंत, फुलांपासून गणपती बाप्पांसाठी हार, फुलांच्या माळांपर्यंत  प्रत्येक वस्तूचे आपले खास महत्त्व असते. घरात गणपती बाप्पा विराजमान झाल्यावर आपण त्या मूर्तीची प्राणपतिष्ठापना करुन मोठ्या भक्तिभावे पूजा व आरती करतो. गणपती बाप्पाची पूजा व आरती यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य आधीच आणून व्यवस्थित ठेवले तर आयत्यावेळी घाई - गडबड होत नाही. आपण गणपती पूजेसाठी लागणाऱ्या आवश्यक आणि पारंपरिक साहित्याची यादी पहाणार आहोत, जेणेकरून तुम्ही कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने सर्व तयारी अगदी झटपट करू शकाल. 

गणपती बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे आवश्यक साहित्य यादी :- 

१. गणपतीच्या पूजेत वाहण्यासाठी २१ दुर्वा, केवडा, हादगा, बोर, मधुमालती, माका, बेलपत्र, धोतरा, तुळस, शमी, विष्णुकांता, आघाडा, डाळिंब, डोरली, देवदार, कण्हेर, मारवा, रूई, अर्जुन, जाई.  

२. फुलांमध्ये चाफा, केवडा, कमळ, मोगरा, जास्वंद, गुलाब, पारिजातक आणि याशिवाय इतर कोणतीही फुलं चालतील. आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या फुलांची सजावट देखील करु शकतो. तसेच गणपती बाप्पाला पूजेत वाहण्यासाठी लागणारी फुले. 

गणेशोत्सवापूर्वी घरातील लाकडी फर्निचर चमकवण्याची भन्नाट १ ट्रिक, वॉर्निश-प्रायमरची गरजच नाही...

३. हळद, कुंकु, गुलाल, अक्षता, गंध, शेंदूर, अष्टगंध, बुक्का, तेल, अत्तर आणि नारळ, कापूर, कोमट पाणी. 

४. १२ विड्याची पानं, १० सुपाऱ्या, खारका, बदाम, कापसाची वस्त्रे आणि जानवं.  

Ganesh Utsav 2025 : पूजेसाठी घरच्या विड्याची पानं हवीत? नागवेलीसाठी ‘हा’ पदार्थ खास खत, वेल होईल हिरवीगार...

५. शमी, दुर्वा, हार उदबत्ती, कापूर, सुट्टे पैसे, कंठी, बाप्पाचे अलंकार आणि दक्षिणा. 

६. पंचखाद्य, पंचामृत, गूळ-खोबरं, पाच प्रकारची फळं, मोदक आणि इतर जो काही प्रसाद. 

चला मग लागा तयारीला आणि गणपती बाप्पा मोरया!

टॅग्स :खरेदीगणेश चतुर्थीगणपती उत्सव २०२५पूजा