वर्षाचा मोठा दिवाळसण आता अगदी अवघ्या काही दिवसांवर आला आहे. आता दिवाळी आली म्हटलं की घरोघरी जशी स्वच्छता, फराळाची तयारी सुरू होते तशीच खरेदीही सुरू होते. स्वत:साठी, घरासाठी, मुलाबाळांसाठी, नातलगांसाठी, मित्रमंडळींसाठी असं सगळ्यांसाठीच आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं. त्यांना काहीतरी द्यायचं असतं. या सगळ्या गोष्टींची खरेदी करता करता मग असं लक्षात येतं की यंदाही आपण अगदी सढळ हाताने खर्च केला असून आता दिवाळीनंतर पुढचा महिना अगदी तंगीतच जाणार आहे. कारण खर्च अगदीच अव्वाच्या सव्वा झालेला असतो.. असं होऊ नये म्हणून दिवाळीची खरेदी करताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे सगळ्यांसाठी सगळं घेता येईल आणि ते ही अगदी आपल्या बजेटमध्ये...(how to avoid excess expenses in diwali shopping)
दिवाळीची खरेदी बजेटमध्ये करण्यासाठी उपाय
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे खरेदीच्या आधी यादी करायला घ्या. तुम्हाला किती जणांना गिफ्ट द्यायचे आहे, त्यापैकी कोणाला काय द्यायचे आहे हे ठरवून घ्या. त्याचप्रमाणे तुमचे बजेटही ठरवून घ्या. जेणेकरून खर्च किती करायचा याचा अंदाज येतो.
गर्भरेशमी पैठणीवर शिवण्यासाठी पाहा ७ लेटेस्ट ब्लाऊज डिझाइन्स-पैठणीचं ब्लाऊजही हवं देखणं आकर्षक
२. दिवाळीची खरेदी करताना बऱ्याचदा असं होतं की आपण अमूक एक रक्कम आपलं बजेट ठेवलेलं असतं. पण आपल्याला त्यापेक्षा महागडी वस्तूच आवडते. उत्साहाच्या भरात आपण दणक्यात खरेदी करतो. पण नंतर मात्र बजेट कोलमडून गेल्यामुळे अस्वस्थ होतं. म्हणूनच तुमची बजेटची मार्किंग लाईन तंतोतंत पाळा. तिच्या पुढे जाऊ नका.
३. सगळ्यांसाठी सरसकट एकच वस्तू घेतली तर तुमचा गिफ्टचा आकडा मोठा होतो. अशावेळी सरळ तुमच्या शहरातल्या होलसेल दुकानात जाऊन सगळ्यांसाठी एकदाच स्वस्तात खरेदी करता येते.
४. ऑनलाईन शॉपिंग साईटवर दिवाळीच्या आधी भरपूर सेल सुरू असतात. त्यामध्ये चांगले गिफ्ट आयटम कमी किमतीत मिळू शकतात. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगचा विचारही नक्की करा. यामुळे वेळ आणि कष्टही वाचतात.
इडलीच्या प्रेमात पडलं गुगल! इडलीच्या गुगल डुडलची भलतीच चर्चा, बघा इडली एवढी खास का?
५. दिवाळीच्या दिवसांत भरपूर प्रदर्शन लागलेले असतात. त्यामध्ये आपण हौशीने जातो, गरज नसताना कित्येक वस्तू विकत घेऊन येतो. हे टाळण्यासाठी तिथे खरेदी करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा आणि स्वत:ला वारंवार विचारा की आपण जी खरेदी करत आहोत, त्या वस्तूंची आपल्याला खरंच गरज आहे का? जर उत्तर नाही आलं तर चुकूनही त्या वस्तूकडे पाहू नका. मोहाला आवर घाला.