Join us  

कोण म्हणतं जाडजूड बायकांना क्रॉप टॉप शोभत नाही? 'या' स्टायलिंग टिप्सनं बिंधास्त करा फॅशन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 1:50 PM

Crop Top Styling Ideas : आपण एकदातरी क्रॉप टॉप घालून पाहायला हवा असं सगळ्याच मुलींना वाटतं. (Crop Top) म्हणूनच  प्लस साईज मैत्रिणींसाठी आम्ही काही स्टाटलिंग टिप्स देणार आहोत.

टिशर्ट, कुर्ते रोज सगळ्याचजणी घालतात. पण क्रॉप टॉप तुम्हाला प्रत्येकीच्या अंगावर दिसणार नाही. क्रॉप टॉपसाठी बांधा बारीक असायला हवा, सड पातळ आणि बेली फॅट नसलेल्या मुलींनाच चांगले दिसतात असा अनेकींचा समज असतो. आपण एकदातरी क्रॉप टॉप घालून पाहायला हवा असं सगळ्याच मुलींना वाटतं. (Crop Top) म्हणूनच  प्लस साईज मैत्रिणींसाठी आम्ही काही स्टाटलिंग टिप्स देणार आहोत. जेणेकरून तुम्ही क्रॉप आत्मविश्वासानं कॅरी करू शकता. (Crop top styling Tips) 

क्रॉप टॉपची साईज

अनेकदा क्रॉप टॉपमुळे पोट दिसतं म्हणून बायका ते घालणं टाळतात.  त्यामुळे तुम्ही असा टाईपचा क्रॉप टॉप निवडा ज्याची उंची  बेंबीपर्यंत तरी असेल. तसंच तुमच्या क्रॉप टॉपची उंची तुमच्या बॉटम स्टाईलवरदेखील अवलंबून असते. तुम्ही जर हायवेस्ट जिन्स घालणार असाल तर तुम्हाला तुमचा क्रॉप टॉप हा छातीच्या उंचीपर्यंत निवडावा लागतो. तर साधी जीन्स असल्यास, क्रॉप टॉप घालताना तुम्ही उंची अधिक ठेऊन तुम्ही लूक खुलवू शकता. 

को आर्ड लूक

तुम्ही क्रॉप टॉप घालण्यासाठी को – आर्ड लूक करू शकता.  तुम्ही क्रॉप टॉपसह हाय वेस्ट स्कर्ट घालून को-आर्ड लुक करता येऊ शकतो.या कपड्यांमध्ये तुम्हाला खूप आरामदायक फिल मिळेल. क्रॉप टॉप न घालण्याचं कारण तुम्ही जाड आहात हे असू शकत नाही. हा ट्रेंड खास फिगरसाठी तयार केलेला असतो.  प्रत्येक महिला साजेसा वाटेल अशी आऊटफिट्सशी रचना केलेली असते.

काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न

तुम्ही किती कॉन्फिडंटली आणि कॅज्यूअली तो आऊटफिट कॅरी करताय हे महत्वाचं असतं.  म्हणून, तुम्ही क्रॉप टॉप अशा प्रकारे घालावा की तो खूप घट्ट किंवा खूप सैलही नाही. तसेच, क्रॉप टॉप घालताना पोटाची जागा लपवण्यावर लक्ष केंद्रित करू नका, उलट ते योग्यरित्या स्टाईल करा. यानंतर तुम्ही स्वतःच स्टायलिश दिसाल. 

टॅग्स :फॅशनखरेदीमहिला