स्वतःच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी तसेच सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक महिला पायांच्या बोटांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत सगळ्या अवयवांची काळजी घेत असतात. आपण सुंदर दिसावं यासाठी (Chrome Nail Powder) त्या दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्स घेत असतात. सौंदर्य म्हटलं की महिला फक्त आपल्या चेहेऱ्याचाच विचार न करता सर्वांगाचा विचार करतात. चेहेऱ्यासोबत त्या हात - पाय यांचीदेखील तितकीच काळजी घेतात. हातापायांचे वेळच्या वेळी मेनिक्युअर, पेडीक्युअर करणे, त्यांची काळजी घेणे, नेलपेंट लावून त्यांची सुंदरता अधिक वाढवणे अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात( How To Use Chrome Nail Powder).
काही महिलांना हातांना वेगवेगळ्या रंगाची नेलपेंट लावायला आवडते. नेलपेंट विकत घेताना शक्यतो ती लिक्विड रुपांत विकत मिळते. परंतु दिवसेंदिवस ब्यूटी ट्रेंड्स बदलत आहे. आता सध्या बाजारात चक्क पावडर स्वरुपातील नेलपेंट विकत मिळते. या पावडर स्वरुपातील नेलपेंटला 'क्रोम नेल पावडर' असे देखील म्हटले जाते. 'क्रोम नेल पावडर' आपल्या नखांवर कशी लावावी ती कुठे विकत मिळते ते पाहूयात.
'क्रोम नेल पावडर' म्हणजे नेमकं काय ?
'क्रोम नेल पावडर' ही पावडर स्वरुपातील नेलपेंट आहे. ही नेलपेंट आपल्या नेहमीच्या नेलपेंट प्रमाणेच लिक्विड स्वरुपात नसून पावडर स्वरुपात असते. ही नेलपेंट पावडर स्वरुपात असली तरीही आपण ती थेट नखांवर लावू शकतो. यात वेगवेगळ्या प्रकारचे रंग विकत मिळतात. आपल्याला जो रंग हवा तो किंवा आपल्या आऊटफिट्सला मॅचिंग असणाऱ्या रंगाशी मिळत्याजुळत्या रंगाची नेलपेंट आपल्या नखांवर लावू शकतो.
चेहऱ्यावर सतत एलोवेरा जेल चोपडताय? वाढू शकतात स्किन प्रॉब्लेम्स कारण...
आता सुई - धाग्याशिवाय बटण शिवण झालं सोपं ! तुटलेलं बटण लावा मिनिटभरात - स्वस्तात मस्त उपाय...
यात आपण आपल्या आवडत्या कोणत्याही ३ रंगाचा कॉम्बो पॅक देखील विकत घेऊ शकतो. ही 'क्रोम नेल पावडर' एका छोट्या डबीत पॅकिंग करुन येते. या सोबत एक छोटे ब्रश देखील दिले जाते. या ब्रशच्या मदतीने आपण ही नेल पावडर नखांवर अगदी झटपट सहज लावू शकतो.
किंमत आणि रेटिंग...
ही 'क्रोम नेल पावडर' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'क्रोम नेल पावडर'ला ३.२ इतके रेटिंग देण्यांत आले. या 'क्रोम नेल पावडरचे' एक पॅक ज्यात ३ वेगवेगळे रंग असतात असे पॅक आपल्याला २९४ रुपयांपर्यंत सहज विकत मिळते. अशी ही 'क्रोम नेल पावडर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/4hTKh0L