Join us  

Social Viral : संभोगादरम्यान एक चूक महागात पडली; काही कळायच्या आतच तिला हार्ट अटॅक आला अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 4:41 PM

Woman get heart attack during sexual intercourse : मला चक्कर येत होती, श्वास घ्यायला त्रास होत होता. याआधी मला असं कधीच जाणवलं नव्हतं. मला खरंच हार्ट अटॅक आलाय, ते ही अशावेळी? यावर विश्वास ठेवणं कठीण होतं.

लैगिंक संबंधांच्या फायद्यांबाबत तुम्ही ऐकून असाल पण संभोग एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचं कारण ठरू शकतं यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. अशीच एक धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑनलाईन वेबसाईट रेडीटशी बोलताना एका महिलेनं वन नाईट स्टँडच्या सेक्सुअल एक्टिव्हीटीनंतर अचानक आलेल्या कार्डिएक अरेस्टबद्दलचा आपला अनुभव शेअर केला.  (Woman get heart attack during sexual intercourse)

या महिलेनं सांगितलं की, ''काही दिवसांपूर्वी मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते. यावेळी मी एका नव्या मित्राला भेटले. सोशल मीडियावर गेल्या एका वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. आम्ही दोघांनीही या लग्नात खूप गप्पा मारल्या. पार्टी संपल्यानंतर मी त्याच्यासह एका हॉटेलमध्ये आले आणि आम्ही एकमेकांच्या जवळ गेलो. आमच्यात सेक्शुअल एंटिमसी खूप चांगली होती. पण सेक्सनंतर अचानक माझ्या छातीत वेदना जाणवू लागल्या.

मला चक्कर येत होती, श्वास घ्यायला त्रास होत होता. याआधी मला असं कधीच जाणवलं नव्हतं. मला खरंच हार्ट अटॅक आलाय, ते ही अशावेळी? यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. नंतर मला आठवलं की, मी अशी औषध घेत आहे ज्यामुळे माझ्या हृदयासंबंधी समस्या वाढू शकतात. हार्ट रेट मॉनिटर करण्यासाठी मी  २ वेळा इसीजीसुद्धा केले होते. त्यावेळी रिपोर्ट नॉर्मल होते.'' 

पुढे ती म्हणाली की, ''यावेळी माझ्यासह हॉटेलमध्ये एक समजदार व्यक्ती उपस्थित असल्यानं त्यानं मला पुरेपूर मदत केली. त्याने माझी पाठ चोळून शांत करण्याचा प्रयत्न केला. नंतर २-३ तास मला झोप आलीच नाही. नंतर वेदना कमी होऊ लागल्या तेव्हा सुटकेचा श्वास घेतला. सकाळी मी सगळ्यात आधी डॉक्टरांना जाऊन भेटले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की, माझा EKG सामान्य आहे. पण लवकरात लवकर कार्डिओलॉजिस्टना भेटण्याची गरज आहे. नंतर मी कार्डिओलॉजिस्टना भेटायला गेले आणि या घटनेबाबत सांगितलं.'' 

महिलेचा हा अनुभव वाचल्यानंतर या युजरनं कमेंट केली की,  अशा घटना इंटर कोर्सदरम्यान घडत असतात. या खूप कॉमन समस्या आहेत म्हणून याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. अशा स्थितीत तुम्ही करत असलेल्या औषधांचे सेवन एक गंभीर विषय ठरू शकतो. 

टॅग्स :लैंगिक आरोग्यरिलेशनशिपलैंगिक जीवनसोशल व्हायरल