Join us  

हस्तमैथून केल्यानं स्पर्म काऊण्ट कमी होतो- मूल होण्यात अडचण येते येतं हे खरं की खोटं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 9:10 PM

act Check Does Masturbation Affects Sperm Count : हस्तमैथून करण्यासंदर्भात अनेक गैरसमज आहे, त्यात वंध्यत्व येणं-संततीला त्रास होणो यासंर्दभात तर अनेक गैरसमज आढळतात.

लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि त्यामुळे होणारे लैंगिक आरोग्याविषयीचे गैरसमज हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. स्त्री-पुरुष दोघांच्या संदर्भात असे गैरसमज लैंगिक सुखात बाधा तर आणतातच पण त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचेही अनेक गंभीर प्रश्न निर्माण करतात.  माहितीचा अभाव, व्हॉटसपीय सल्ले यामुळे अनेकांच्या समज गैरसमज होतात. (Does Masturbation Affects Sperm Count)

सेक्शुअल गोष्टींबाबत चर्चा करण्याचीही सोय नाही आणि अनेकजण त्याविषयी बोलण्यास घाबरतात. डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर उपाय करतात. असाच एक प्रश्न म्हणजे हस्तमैथूनाविषयी असलेले गैरसमज. अहस्तमैथून केल्याने शरीर कमकुवत होते, इन्फर्टिलिटीची समस्या उद्भवते, स्पर्म काऊंट खरंच कमी होतो असे अनेक समज-गैरसमज आहेत. मात्र खरंच हस्तमैथून केल्यानं वंध्यत्व येतं का? डॉक्टर सांगतात..

हस्तमैथून केल्यानं स्पर्म काऊंट कमी होते का? (Masturbation Effects)

फिजिशियन डॉ. समीर सांगतात  हस्तमैथून करण्याचा आणि स्पर्म काऊण्ट कमी होण्याचा काहीही संबंध नाही. विर्य शरीरात तयार होते, हस्तमैथून केल्यानं ते बाहेर पडते. त्यामुळे विर्य कमी होणं किंवा स्पर्म काऊण्ट कमी होणं याच्याशी हस्तमैथून करण्याचा आणि पुढे संतती न होण्याचा काही संबंध नाही.

स्पर्म काऊण्ट कमी होतो कारण.. (Reasons Of Low Sperm Count)

स्पर्म काऊंट कमी होण्याची अनेक कारणं आहेत. खाणंपिणं, चुकीची लाईफस्टाईल आणि शारीरिक समस्यांमुळे स्पर्म काऊंट कमी होतो. स्पर्म काऊंट कमी होण्याची अनेक कारणं असतात. लठ्ठपणा, औषधांचे सेवन, टेस्किटल्स जास्त गरम होणं, स्ट्रेस आणि मानसिक आजार, असंतुलित खाणं-पिणं, स्मोकींग यामुळे ते कमी होऊ शकते.

चांगला आहार, व्यायाम, व्यसनं न करणं, स्ट्रेस कमी, चांगली जीवनशैली यानं विर्य आणि स्पर्म काऊण्ट वाढू शकतो. मेन्स एक्सपी शी बोलताना डॉ. अर्जून यांनी सांगितले विर्य प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार रोज तयार होते. ही ग्रंथी भरल्यानंतर त्यातून विर्य बाहेर येते. काही लोक हस्तमैथून करत नसले तरी नाईट फॉलच्या माध्यमातून विर्य बाहेर येते. म्हणूनच हस्तमैथून करण्याचा वंध्यत्व येण्याशी संबंध नाही.

टॅग्स :लैंगिक जीवनलैंगिक आरोग्य