Join us  

Sexual Health : म्हणून कमी वयातच पुरूषांच्या स्पर्म्स काऊंटवर होतोय गंभीर परिणाम; आजच सोडा 'ही' सवय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 3:18 PM

 Sexual Health : अधुनिक जीवनातील बदल पुरूषांच्या शुक्राणूंसाठी अनुकूल नसावेत परंतु हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.

सध्याच्या काळात मोबाईल लोकांना जीवापेक्षाही जास्त प्रिय आहे. जगभरातील लाखो लोक दिवसभर मोबाईलवर काम करत असतात. लहान मुलांच्या अभ्यासापासून अनेक महत्वाच्या कामांसाठी मोबाईल लागतोच. किपॅड मोबाईलची जागा आता स्मार्टफोननं घेतली आहे.  

तुम्हाला कल्पना नसेल पण मोबाईलचा अतिवापर वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करू शकतो. अलिकडेच झालेल्या एका रिसर्चनुसार मोबाईल फोनमुळे  पुरूषांमध्ये वंध्यत्वाची (Infertility) समस्या उद्भवू शकते. मोबाईलमुळे पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या (Sperm count and quality) आणि गुणवत्तेवर परिणाम होतो. 

१८ अभ्यासांवर आधारित हा निष्कर्ष काढण्यात आला. दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी  ४ हजार २८९ नमुन्यांच्या १८ रिसर्चचे विश्लेषण केले.  त्यानंतर त्यांनी सल्ला दिला की, मोबाईलमधून बाहेर पडणारे विद्यूत चुम्बकीय तरंग (Electromagnetic waves) शुक्राणूंना नुकसान पोहोचवतात. हा धोका टाळण्यासाठी मोबाईलचा वापर कमी करायला हवा.

शेफिल्ड विश्वविद्यालयातील एंड्रेलॉजीचे प्राध्यापक आणि शुक्राणू विशेषज्ञ एलन पेसी यांनी संशोधकांच्या या निष्कर्षांवर प्रश्न उपस्थित केले आणि म्हणाले की अधुनिक जीवनातील बदल पुरूषांच्या शुक्राणूंसाठी अनुकूल नसावेत परंतु हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. जर पुरूषांमध्ये या अभ्यासामुळे काळजीचं वातावरण असेल तर त्यांनी मोबाईलचा वापर टाळायला हवा. 

पुसान नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रमुख संशोधक डॉ. यून हाक किम यांनी सांगितले की, ''जे लोक मोबाईल फोन्सचा जास्त वापर करत आहेत. त्यांनी आपल्या शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या योग्य ठेवण्याासाठी मोबाईलचा वापर कमी करावा. सध्याच्या डिजीटल जगात मोबाईल फोनमधून बाहेर येत असलेले चुम्बकिय तरंगांच्या संपर्कात आल्यानं शुक्राणू प्रभावीत होतात. यावर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.'' 

वाढत्या वयाचा शुक्राणूंच्या गुणवत्तेवर कसा परिणाम होतो?

जिनिव्हाच्या संशोधकांनी आणि ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड लिडिंग आव्हीएफ क्लिनिकनं जवळपास ४० हजारापेक्षा जास्त टेस्टचे विश्लेषण केल्यानंतर दावा केला की वाढत्या वयात शुक्राणूंची गुणवत्ता कमी होत जाते. ५५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये शुक्राणूंची कमतरता दिसून येते. 

टॅग्स :लैंगिक आरोग्यलैंगिक जीवन