Join us  

ऑफिसातली मैत्री की प्रोफेशनल नेटवर्किंग? मैत्रीतला खरेपणा ऑफिसमध्ये खरंच सापडतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 3:12 PM

व्यावसायिक मैत्री करताना काही गोष्टी लक्षात ठेवलेल्या बऱ्या.

ठळक मुद्देमैत्रीतला पझेसिव्हनेस इथं काहीही कामाचा नाही, हे शुद्ध व्यावसायिक मैत्रीचं नातं आहे हे कधीही अजिबात विसरु नये.

एक लडका-एक लडकी दोस्त नहीं हो सकते असं सिनेमात म्हणण्याचाही एक काळ होता. पुढच्या काळात सिनेमानं मुलामुलींची मैत्री दा‌खवली आता तर सिरिअलमध्येही मुलामुलींची व्यावसायिक मैत्री दाखवतात. मैत्री या निकोप गोष्टीचं एक छान रुप माध्यमात दिसतं. सोशल मीडियात तर अगदी अनोळखी लोकांनाही लालचुटूक हार्ट दिले जातात. पण आजही व्यावसायिक आयुष्यात, रोज किमान आठ तास एकमेकांबरोबर काम करणारे एकमेकांचे मित्र असतात का? होऊ शकतात का? मैत्री असते आणि कार्यालयीन राजकारण त्या मैत्रीचा बळी घेते असं काही होतं का?आजकाल तर पुरुषांपेक्षाही महिलांच्या प्रोफेशनल मैत्रीबद्दल बोललं जातं. प्रोफेशनल मैत्री कशी असावी, कुणाशी असावी, त्यातून करिअरवर काय परिणाम होतो हे सारं आता नव्या कार्यालयीन संस्कृतीचा भाग बनतो आहे. त्यात मोकळेपणाही आहे.  रोजच्या कामाचा व्याप सांभाळताना नवीन नाती जुळतात. गप्पा-विनोद, शेअरिंग होतं. एकमेकांची सुखदु:ख कळतात. पण अनेकदा त्या मैत्रीत अविश्वासच दिसतो. आणि परिणाम असा की कार्यालयातील राजकारणातही मैत्रीचा आणि व्यक्तीचा जीव जातो.

(Image :google)

लक्षात काय ठेवायचं?

१. आपण पर्सनली किती शेअर करतो, काय काय सांगतो. काय बोलतो. पैसे किती देतो घेतो. पार्ट्या करतो, सिक्रेट सांगतो यात आपली आपण मर्यादा ओळखली पाहिजे.२) मैत्री होते पण हे नातं व्यावसायिक आहे आपल्या शाळकरी मित्रांसारखं निकोप कदाचित हे नातं नसेल हे गृहित धरावं.३) ऑफिसमध्ये राजकारण करता, साहेबाच्या पुढे पुढे करत, खोटं बोलून, डबल क्रॉस करुन मैत्री होत नाही. अनेकजण ते करतात ते बाकीच्यांच्या सहज लक्षात येतं.

४) सहकारी भविष्यात आपला बॉस होऊ शकतो, मित्र असले तरी सिनिअर असू शकतो आणि त्रासही देऊ शकतो हे विसरु नये. ५) मैत्रीतला पझेसिव्हनेस इथं काहीही कामाचा नाही, हे शुद्ध व्यावसायिक मैत्रीचं नातं आहे हे कधीही अजिबात विसरु नये. 

टॅग्स :रिलेशनशिप