Join us  

तुमचा जोडीदार सतत तुमचा मोबाइल तपासतो, मेसेज वाचतो? हे प्रेम - पझेसिव्हनेस की अविश्वास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2024 1:25 PM

Is constantly checking on my partner's phone okay : जोडीदार वारंवार मोबाईल फोन लपून-छपून चेक करत असेल तर हक्कच आहे म्हणून दुर्लक्ष करु नका..

रिलेशनशिपमध्ये एकमेकांचे मोबाईल फोन तपासणं कॉमन झालं आहे. पण ही गोष्ट क्वचित घडणं ठीक आहे, पण वारंवार पार्टनर संशयाच्या दृष्टीने मोबाईल फोन चेक करत असेल तर, या प्रकरणाकडे दुर्लक्ष करू नका. आपला पार्टनर दुसऱ्या कोणत्या मुलीशी किंवा मुलासोबत लपून-छपून तर बोलत नाही ना? त्याच किंवा तिचं दुसऱ्या कोणाबरोबर अफेअर तर नाही ना? यासह इतर गोष्टी तपासण्यासाठी बरेच जण आपल्या पार्टनरचे मोबाईल फोन चेक करतात (Mobile Phone). पण यामुळे नात्यात असणारा विश्वास कमी होतो, शिवाय अनेक गैरसमज निर्माण होतात (Relationship Tips).

अशावेळी पझेसिव्ह पार्टनरची मनस्थिती कशी समजून घ्यावी? (Couple Things) जोडीदाराला हर्ट न करता पसर्नल स्पेस कशी निर्माण करायची?(Is constantly checking on my partner's phone okay).

याबद्दलची माहिती देताना प्रिडिक्शन्स फॉर सक्सेसचे संस्थापक आणि रिलेशनशिप कोच विशाल भारद्वाज सांगतात, 'नातं विश्वासावर टिकते. रिलेशनशिपमध्ये संवाद, पारदर्शकता आणि परस्पर एकमेकांचा आदर करणं गरजेचं आहे. तसेच शंका असल्यास आपल्या जोडीदाराशी थेट बोला. आपल्या पार्टनरचा मोबाईल फोन त्यांच्या परवानगीशिवाय तपासू नका. यामुळे नात्यातील विश्वास कमी होतो. प्रत्येक नात्यात बाउन्ड्री असणं गरजेचं आहे.'

जोडीदार नेमका कसा हवा? लग्नाला ‘हो’ म्हणण्यापूर्वी ३ गोष्टी तपासा, जया किशोरी सांगतात...

जोडीदाराचा मोबाईल फोन तपासणे योग्य की अयोग्य?

- दिसतं तसं नसतं, ही म्हण आपण ऐकलीच असेल. बऱ्याचदा मोबाईल फोन चेक करताना आपण अशा काही गोष्टी पाहतो, ज्याच्या आधारावर आपण पार्टनरवर संशय घेतो. ज्यामुळे नातेसंबंधातील विश्वासावर तडा निर्माण होतो. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी जोडीदाराची बाजू नक्कीच जाणून घ्या.

डॉ. विकास दिव्यकिर्तींचा तरुण मुलींना खास सल्ला, लग्नाचा निर्णय घेताना ‘त्याला’ विचारा १ प्रश्न

- प्रत्येक नात्याला काही मर्यादा असतात. प्रत्येकाला प्रायव्हसीचा अधिकार आहे. त्यामुळे जोडीदाराचा मोबाईल फोन चेक करण्यापूर्वी त्यांची परवानगी नक्की घ्या. जर आपण न विचारता जोडीदाराचा मोबाईल फोन चेक करत असाल तर, विश्वासाचे बंधन कमकुवत होऊ शकते. त्यामुळे गैरसमज असेल तर, बोलून दूर करा. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपसोशल व्हायरल