Join us  

'..नवरा गेल्यावर स्वतःला सावरण्यासाठी मी!' - मंदिरा बेदी सांगते दुःखातून सावरण्याची तिची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2022 5:43 PM

स्वत:ला शांत ठेवण्यासाठी मी सर्व प्रकारचे प्रयत्न केले, मंदिरा बेदी सांगते तिच्या लढ्याविषयी...

ठळक मुद्देकाही वर्ष मी देवाची प्रार्थना कऱण्यातून ब्रेक घेतला याचे कारण म्हणजे मी तेव्हा एकावेळी अनेक गोष्टींतून जात होते. माझ्या आयुष्यात खूप राग आणि नकारात्मकता होती, पण स्वत:ला शांत करण्यासाठी मी विविध प्रकारच्या थेरपींचा वापर केला.

आयुष्याचा जोडीदार गमावल्यावर एखाद्याची काय अवस्था होते हे आपल्याला माहित आहे. आयुष्यभर ज्याच्यासोबत जगण्याच्या आणाभाका आपण घेतो तो व्यक्तीच एकाएकी आयुष्यातून गेल्यावर आपले आयुष्य किती कठिण होते ही जी व्यक्ती त्यातून जाते तिच सांगू शकेल. प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी हिनेही काही महिन्यांपूर्वी तिच्या जोडीदाराला गमावले. २०२१ च्या जूनमध्ये राज कौशल याचा अचानक मृत्यू झाल्यानंतर मंदिरा एकटी पडली. पण काही गोष्टींमुळे मी स्वत:ला या कठिण परिस्थितीतून तारुन नेऊ शकले असे तिने एका मुलाखतीत सांगितले. आता आपण देवाला प्रार्थना कऱण्यातून काही काळ विश्रांती घेतली असली तरी हे सगळे आपल्याबरोबरच का घडले असा प्रश्न आपण देवाला कधीच विचारला नाही असे मंदिरा या मुलाखतीत म्हणाली. 

(Image : Google)

निर्माता आणि दिग्दर्शक राज कौशल याचे आणि मंदिरा बेदी यांचे १९९९ च्या फेब्रुवारीमध्ये लग्न झाले होते. त्यानंतर त्यांना २०११ मध्ये एक मुलगा झाला ज्याचे नाव वीर आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी ४ वर्षांची एक मुलगी दत्तक घेतली जीचे नाव तारा आहे. मंदिरा म्हणते, “माझ्या आयुष्यात गोष्टी अनपेक्षितपणे घडत गेल्या किंवा आम्हाला हव्या तशा त्या घडल्या नाहीत. मात्र त्यातही देवाला आमच्याकडून काहीतरी अपेक्षित असेल असे मला वाटते. त्यामुळे माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. माझ्या मुलांना सकारात्मकता, आनंद आणि प्रेम द्यायचे असेल तर आता मला खंबीर राहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. माझ्या आयुष्यात खूप राग आणि नकारात्मकता होती, पण स्वत:ला शांत करण्यासाठी मी विविध प्रकारच्या थेरपींचा वापर केला. आता मला माझे आणि मुलांचे आयुष्य पुढे न्यायचे आहे.” 

(Image : Google)

पुढे मंदिरा म्हणते, देवाची प्रार्थना करण्यावर आपला विश्वास असून मी अनेक वर्षे प्रार्थना करत होते. काही वर्ष मी देवाची प्रार्थना कऱण्यातून ब्रेक घेतला याचे कारण म्हणजे मी तेव्हा एकावेळी अनेक गोष्टींतून जात होते. पण नंतर एक वेळ अशी आली की मला कळले की ही मी नाही. जानेवारीमध्ये मंदिरा तिची जवळची मैत्रीण मौनी रॉय हिच्या लग्नात गोव्यात दिसली होती. त्यामुळे नवऱ्याच्या निधनानंतर मंदिरासारख्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीची झालेली अवस्था आपल्याला यातून समजू शकते. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपमंदिरा बेदी