Join us  

म्हणायला बेस्टफ्रेंड पण ती मैत्रीच आपल्या मार्गातला काटा आहे, हे कसं ओळखाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 4:34 PM

आपली किंवा आपला बेस्ट फ्रेंड आपला तिरस्कार करत असू शकतो. हे कसे ओळखायचे ते पाहूया... 

ठळक मुद्दे तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलू नका असे त्यांना थेट सांगायला मागे-पुढे बघू नका. भेटण्याचा किंवा एकमेकांशी फोनवर बोलण्याचा प्लॅन नेहमी तुम्ही एकटेच करत असाल तर तुमच्या मित्र-मैत्रीणीचा तुमच्यातील इंटरेस्ट संपला आहे हे ओळखा.

आपल्या ब्रेस्टफ्रेंडची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही. आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट आपण जिच्याशी किंवा ज्याच्याशी मोकळेपणाने शेअर करु शकतो अशी व्यक्ती म्हणजे बेस्ट फ्रेंड. कठिण प्रसंगात आपल्या बाजूला असलेली आणि आपल्या आनंदात जिचा किंवा ज्याचा सगळा आनंद सामावलेला असतो अशी व्यक्ती सगळ्यांसाठीच खास असते. मग अगदी खरेदीला जायचे असो किंवा एखाद्या मुलाखतीला. आपण बेस्ट फ्रेंडला सगळे अपडेट देतोच देतो. ही जागा इतकी खास असते की ती कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हे सगळे खरे असले तरी आपल्या बेस्ट फ्रेंडलाही आपल्या काही गोष्टी आवडत नाहीत आणि ते आपल्याला हेट करतात, हे ऐकून तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण आपली किंवा आपला बेस्ट फ्रेंड आपला तिरस्कार करत असू शकतो. हे कसे ओळखायचे ते पाहूया... 

(Image : Google)

१. तुमच्याबद्दल वाईट बोलतात

तुमच्या तोंडावर कितीही चांगले बोलत असले तरी तुमच्या मागे जर तुमचे मित्रमंडळी वाईट बोलत असतील तर त्यांच्यासोबत नाते तोडून टाका. कारण त्यांना आपल्याबद्दल असे म्ङणायचे नव्हते असे एखादवेळी होऊ शकते. पण सतत असे होत असेल तर असे मित्र काय कामाचे. तुमचे कौतुक न करता तुमच्या मागे बोलणाऱ्या लोकांची मैत्री काय कामाची 

२. तुमची कर्तबगारी ते सेलिब्रेट करत नाहीत 

मित्र म्हणजे आपल्या आनंदात आनंदी असणारा आणि दु:खात दु:खी असणारा व्यक्ती. पण तुमच्या आनंदाने ज्याला आनंद होत नसेल तो तुमचा खरा मित्र असूच शकत नाही. तुमचे यश जो सेलिब्रेट करु शकत नाही किंवा त्यात इतकं काय कौतुक असे ज्याला वाटते तो तुमच्यावर प्रेम करत नाही आणि त्याला तुमच्या गोष्टींचे कौतुक नाही हे वेळीच लक्षात घ्या. 

३. तुम्ही मूर्ख असल्याचे दाखवून देतात

तुमच्या लहान सहान चुका दाखवण्याचे काम तुमच्या जवळच्या मित्राकडून किंवा मैत्रीणीकडून होत असेल तर ते तुम्हाला सतत दाबायचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात घ्या. तुमच्या ज्ञानाबद्दल त्याला तिरस्कार असून तुमच्या हुशारीमुळे तो किंवा ती झाकली जाईल असे वाटल्याने ते असे करतात हे वेळीच लक्षात घ्या. 

(Image : Google)

४. सतत तुम्हीच संपर्क ठेवण्याचा प्रयत्नात असाल तर

कोणतेही नाते हे दोन्ही बाजूने जपले जायला हवे. पण ते जर एकाच बाजूने जपले जात असेल तर मात्र याबाबत पुर्नविचार करण्याची वेळ आली आहे हे वेळीच ओळखा. भेटण्याचा किंवा एकमेकांशी फोनवर बोलण्याचा प्लॅन नेहमी तुम्ही एकटेच करत असाल तर तुमच्या मित्र-मैत्रीणीचा तुमच्यातील इंटरेस्ट संपला आहे हे ओळखा.

५. ते सतत तुमची चेष्टा करतात

ग्रुपमध्ये असताना तुमचा बेस्टे फ्रेंड तुमची सतत चेष्टा करत असेल किंवा खिल्ली उडवत असेल तर ते तुमचा आदर करत नाहीत हे लक्षात घ्या. तुम्हाला वाईट वाटेल असं वागत असतील तर ते तुमचे हितचिंतक नाहीत हे समजून घ्या. अशावेळी तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलू नका असे त्यांना थेट सांगायला मागे-पुढे बघू नका. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप