Join us  

फेक ऑरगॅझम म्हणजे काय? ४ कारणं, अनेक महिलांना ऑरगॅझमचा कधीच अनुभव येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2023 4:15 PM

4 Sad But True Reasons Women Fake Orgasms : बहुतांश स्त्रिया लैंगिक आरोग्याबद्दल बोलण्यास टाळतात. परंतु, या गोष्टी जाणून घेणं गरजेचं..

महिलांचेलैंगिक आरोग्य (Sexual Health) हा एक असा मुद्दा आहे, ज्याबद्दल त्यांना स्वतःला फारशी माहिती नसते. किंवा महिला चारचौघात बोलणंही टाळतात. यातील एक मुद्दा म्हणजे फिमेल ऑरगॅझम (Female Orgasm). फिमेल प्लेजरबद्दल बोलणं झालं तर, सुमारे ६० टक्के महिलांना कामोत्तेजना होत नाही. क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालात असा दावा करण्यात आलाय की, केवळ १० टक्के महिलांना पहिल्या क्षणी कामोत्तेजना होते. अन्य ९० टक्के महिलांना फोरप्ले (Foreplay) केल्यानंतर कामोत्तेजना होते.

अनेकदा शारीरिक संबंध ठेवताना महिलांना परमोच्च आनंदाची प्राप्ती होईलच असे नाही. त्यामुळे महिलांना ऑरगॅझम न येणे हे सामान्य आहे का? त्यांना सेक्स करताना कामोत्तेजना होते की नाही? याची माहिती प्रसूती-स्त्रीरोग तज्ज्ञ, वंध्यत्व विशेषतज्ज्ञ डॉ. तनुश्री पांडे पाडगावकर यांनी, सोशल मिडिया अकाउंटवर माहिती शेअर करत दिली आहे(4 Sad But True Reasons Women Fake Orgasms).

महिलांना शारीरिक संबंध ठेवताना ऑरगॅझम न येणे सामान्य आहे का?

डॉक्टर तनुश्री म्हणतात, 'महिलांना सेक्स करताना ऑरगॅझम न येणे सामान्य आहे. अर्ध्याहून अधिक महिलांना इंटिमेट होताना ऑरगॅझम येत नाही. जर आपल्यालाही या गोष्टीची काळजी वाटत असेल तर, डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्यावा.'

दीपिका पादुकोण ट्रोल होतेय, मात्र ओपन रिलेशनशिपचा निर्णय अनेकजण का घेतात? कमिटमेण्टची भीती की..

कोणत्या कारणांमुळे महिलांना कामोत्तेजना होत नाही?

एंग्जायटी

२०१८ साली इंडियाना, यूएसएच्या वलपरिसो युनिव्हर्सिटीने एक सर्वेक्षण केले. ज्यामध्ये शारीरिक संबंध ठेवताना अनकेदा महिला एंग्जाटीला बळी पडतात. यादरम्यान परफॉर्मेंस प्रेशर तर असतेच, शिवाय आपल्या जोडीदाराच्या भावना दुखावल्या तर जाणार नाहीत ना, याची देखील काळजी सतावते. अनकेदा मास्टरबेशन  करतानाही एंग्जायटी फील होते.

इंटिमेटदरम्यान ऑक्सिटोसिनची कमतरता

डॉक्टर तनुश्री म्हणतात, 'जर आपण उत्तेजित होत नसाल तर, शरीरात लव्ह हार्मोन ऑक्सीटोसिन तयार होत नाही, आणि जर शारीरिक संबंध ठेवताना हा हार्मोन नसेल तर, कामोत्तेजना जाणवत नाही.'

डोळ्यावर झापडं लावून लग्नाचा निर्णय घेताय की रेड फ्लॅग-ग्रीन फ्लॅग दिसतात तुम्हाला?

इंटिमेट होताना ट्रॉमा आठवणे

अनेकदा महिलांना भूतकाळातील नातेसंबंधातील काही ट्रॉमा आठवतात. ज्यामुळे शारीरिक संबंध ठेवताना ऑरगॅझम येत नाही. या  कारणामुळे शारीरिक सुख मिळणे कठीण होते. महिलांना पार्टनरसह फिजिकल होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मन शांत ठेवा. भूतकाळातल्या गोष्टी, किंवा ट्रॉमामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडवू नका.

भरपूर पाणी प्या

थकवा, बद्धकोष्ठता आणि मूड या सर्व गोष्टींमुळे देखील ऑरगॅझम येत नाही. दिवसभरात वेळेवर पाणी प्या. शरीर हायड्रेटेड ठेवा. शरीरातील टिश्यू शरीर हायड्रेट असल्यामुळे चांगली कामगिरी करू शकतात. ज्यामुळे कोणतीही समस्या उद्भवत नाही.

टॅग्स :लैंगिक जीवनलैंगिक आरोग्यमहिलाहेल्थ टिप्स