say no to old sweater, try this new winter fashion trends.. | थंडी आली की तेच ते जुने स्वेटर घालायचा जमाना गेला, आता थंडीसाठी खास ‘हे’ घ्या!
थंडी आली की तेच ते जुने स्वेटर घालायचा जमाना गेला, आता थंडीसाठी खास ‘हे’ घ्या!

ठळक मुद्देथंडीत फॅशनेबल रहायचं नाही तर मग काय उपयोग फॅशनचा!

सारिका पूरकर-गुजराथी

गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे. हिवाळा तसा सर्वांच्याच आवडीचा ऋतू. खाण्यापिण्याची चंगळ, लग्नसराईची धामधूम, त्यामुळे सजणे-नटणे, कॉलेजेसमध्ये डेजची धमाल.सगळं कसं फुल टू एन्जॉय असंच असते. कडाक्याच्या थंडी आणि वाफाळता आले घातलेला चहा, गरमागरम सूप्स. डिंकाचा लाडू, मटाराच्या करंज्या हे जसे समीकरण होऊन बसलेय ना, त्याचप्रमाणे थंडी म्हटलं की मस्त आऊटिंग, सेलिब्रेशन, भरीत पार्टी-हुरडा पार्टी, गेट टुगेदर असेही समीकरण बनत चाललेय. इतकं सारं काही सुरु  असतं या हिवाळ्यात, .थंडी मनसोक्त एन्जॉय करायची तर त्यासाठी थंडीपासून बचाव करण्यासाठी वॉर्डरोबही सज्ज हवा की नको. आली थंडी की काढा कपाटातून तेच ते स्वेटर्स आणि घाला तेच जुनाट कपडे हा जमाना गेलाय आता.गुलाबी थंडीचे स्वागतही झोकात करण्यासाठी यंदा हे ट्रेंडस फॉलो करा.
थंडीत मस्त फॅशनेबल नाही रहायचं तर कधी?

यंदाच्या थंडीत ‘हॉट’ आणि ‘हीट’ असलेले हे घ्या स्टायलिश कपडे

 

 

पफर जॅकेट 


यंदाच्या हिवाळ्यातील इन असा ट्रेंड आहे. पफर जॅकेट तुम्हाला यंग,  स्पोर्टी लूक तर देतोच शिवाय हिवाळ्यातील तुमचा वर्षानुवर्षांचा लूक बदलवून मेकओव्हरही करतो. बेज, बेबी पिंक, मिलिटरी कलर, ब्लॅक हे रंग पफर जॅकेटसाठी सर्वात बेस्ट पर्याय ठरतात. जीन्स, कुर्तीज, साडी, स्कर्ट अशा कुठल्याही पेहरावावर ते सहज फिट होतात.लाँग आणि शॉर्ट पॅॅटर्न अशा दोनही प्रकारामध्ये हे पफर जॅकेट छान वाटतात. फॉक्स फर किंवा फेक फरची कॉलर तसेच कफ असलेले पफर ट्रेंडी लूकमध्ये आणखी भर घालतात. क्र ॉप्ड पफर जॅॅकेट हा प्रकार देखील यंगस्टर्समध्ये भाव खाऊन आहे.
हुडी जॅकेट 
 यंदाच्या थंडीत कम्फर्ट विथ स्टाईल असं काहीतरी शोधत असाल तर बिनधास्त हुडी जॅकेटला पसंती देऊन टाका. अत्यंत सुटसुटीत तसेच आकर्षक रंगसंगतीत हुडी जॅकेट उपलब्ध आहेत. प्लेन, विथ लेटरिंग तसेच प्रिंटेड हुडी जॅकेट्स पिवळा, गुलाबी, मरु न, राखाडी रंगात अधिक पसंत केले जातात. या जॅकेटला कॅप देखील अटॅच्ड असल्यामुळे वेगळा स्कार्फ बांधायची  गरज भासत  नाही. स्वेट शर्ट्समधील हा प्रकार सर्वच वयोगटासाठी उत्तम पर्याय सिद्ध होत आहे.

रॅप कोट 


सोप्या भाषेत सांगायचे झाले तर अंगारखा कोट हा प्रकार जास्तीच्या थंडीत तुमचे संरक्षण करेलच शिवाय तुम्हाला एक डॅशिंग तसेच कॉन्फिडंट लूक देईल. रॅप कोट म्हणजे उजवीकडची बाजू डावीकडे वळवून नंतर बटन्स अथवा बेल्ट लावले जातात. त्याचा लूक रॅप केल्यासारखा दिसतो. अंगारखा कुर्ता/कुर्ती असते तसेच हा रॅप कोट. उंचीला जास्त असणारा हा रॅप कोट डेनिम्सवर क्लासिक लूक देतो.

बॉम्बर


 विंटर फॅशनचा ऑल राऊंडर म्हणून हा प्रकार ओळखला जातो. कारण जशी तुमची आवश्यकता असते, तसे बॉम्बर जॅकेट कॅरी करता येते. कॅज्युअल लूक हवा असेल तर स्निकर्स, जॉगर्सवर तुम्ही  ते घालू शकता. एलिगंट लूक हवा असेल तर जीन्स, शर्टवर तुम्ही घालू शकता.

चेक्स कोट 


 हा कोट घालून तुम्ही मिरवलात ना,  तर प्रत्येक फॅशिनस्टा तुमची फॅन झालीच समजा. चौकडीचे डिझाईन आणि नी लेंथ असा या कोटचा लूक असतो. फॉर्मल लूकसाठी याशिवाय दुसरा कोणता पर्याय असूच  शकत नाही. प्लेन  टॉपवर फिकट राखाडी रंगात हा कोट  घातला तर आणखी बेस्ट. तसेच फॉर्मल लूक  नको असेल तर पिवळा, केशरी अशा ब्राईट रंगाच्या टॉपवर कोट कॅरी करा, जोडीला स्निकर्स विसरु  नका.

जम्पर 


 हिवाळ्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणून अनेकांची पसंती जम्परला मिळतेय, कारण  जम्पर हा ट्रेंड सध्या प्रचंड लोकिप्रय झालाय. हायनेक, बोटनेक, व्ही नेकचे लाँग पॅटर्नचे हे जम्पर स्वेटर्स लाईम व पॅरट ग्रीन रंगांमध्ये ट्राय करण्याकडे कल आहे. हे जम्पर्स जीन्स, स्कर्ट्सवरही कमालीचे सुंदर वाटतात.

ट्रॅडिशनल


 थंडीतही तुम्ही शुद्ध देसी काहीतरी हवे असेल तर काश्मिरी पोंचो, कोट जॅकेट, वूलन कुर्तीज, लाँग श्रग, बेल्ट स्वेटर्स हे प्रकार नक्की ट्राय करु  शकता. जोडीला छानशा गोंडेदार, फुलं लावलेल्या कानटोप्या, मफलर्स, वुलन स्टोल्स विसरु  नका. 

Web Title: say no to old sweater, try this new winter fashion trends..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.