sajan film madhuri dixit long kurta is back in fashion! | ‘बहोत प्यार करते है’... या गाण्यातला माधुरीचा कुर्ता पहा! आता तोच ट्रेण्ड म्हणून परत आलाय..
‘बहोत प्यार करते है’... या गाण्यातला माधुरीचा कुर्ता पहा! आता तोच ट्रेण्ड म्हणून परत आलाय..

ठळक मुद्देलॉँग जॅकेट कुर्तीचा हा ट्रेण्ड फॉलो नाही केला?- तो  फिर किया तो क्या किया?

सारिका पूरकर-गुजराथी

ट्रॅडिशनल  तरीही सुटसुटीत, ट्रेंडी, स्टायलिश लूकसाठी कुर्ती हा ड्रेसकोड सध्या साडीपेक्षाही भाव खाऊन जातोय.   कारण नानाविध प्रकार व विविध प्रसंगानुरु प पॅण्ट्स कुर्तीजमध्ये उपलब्ध होऊ लागले आहेत.  म्हणूनच कॉर्पोरेट मिटींग्ज, वेडिंग सीझन, फॅमिली गेट टुगेदर, आऊटिंग या सर्वच प्रसंगी कुर्ती ही फस्ट चॉईस बनली आहे.  योग्य प्रसंगासाठी योग्य कुर्तीची निवड केली तर नक्कीच तुमच्या व्यक्तिमत्वाची वेगळी छाप पडल्याशिवाय राहणार नाही.  कुर्तीजमधील ट्रेंड फॉलो करायचं म्हणत असाल तर तुम्ही बिनधास्त लाँग जॅकेट कुर्ती ट्राय करा.  


1. सध्या ट्रेंड आहे तो लाँग जॅकेट कुर्तीजचा.  कम्फर्ट आणि एलिगंससाठी कुर्तीजचा हा प्रकार तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवा.  ए लाईन तसेच फिट अँड  फ्लेअर  कुर्तीवर लाँग जॅकेट हे काहीवेळेस स्टिच केलेले असते.  तर काही वेळेस हे जॅकेट कुर्तीसोबत वेगळे दिले जाते.  या जॅकेटमुळे कुर्तीचा लूक एकदम रिफ्रेशिंग बनतो.  ही कुर्ती फ्लोअरलेंथ तसेच त्यापेक्षा कमी उंचीची असते. 
2. रेयॉन , कॉटन, शिफॉन  फॅब्रिकमधील कुर्तीजमध्ये हा प्रकार खूप खुलतो.  ही कुर्ती लेगिन्स, डेनिम, पलाझोवर सहज  कॅरी करता येते तसेच ती तुम्हाला सुपरसोबर लूक मिळवून देते.  
3. या कुर्तीजवरच्या जॅकेट कधी बंद गळा किंवा गळ्याशी एक बटन लावून फ्लेअर्ड लूक देणारे असते.  तर काही जॅकेटला विशेषतर्‍ एथनिक कुर्तीजला कॉलर जॅकेटने शाही लूक मिळतो. 
4. कॉटन लाँग जॅकेट राजस्थानी पॅटर्नमध्ये, जयपूरी नेक डिझाईनमध्येही छान वाटते.  पुढच्या बाजूने या जॅकेटला लेस असतात, त्या तुम्हाला हव्या तर बांधता येतात, नाही तर मोकळ्या ठेवता येतात. 
5. कॉटन कुर्तीजवर नेट अथवा सुपरनेट फेब्रिकधील लाँग जॅकेटही खूप खुलून दिसते.  फेस्टिव्ह सीझनसाठी सिल्क कुर्तीजवर नेट लाँग जॅकेट हवेच हवे. 
6. पार्टीज, स्वागत समारंभासाठी लाँग जॅकेट कुर्ती ट्राय करत असाल तर हेवी एम्ब्रॉयडरी  म्हणजेच पारंपरिक भरतकाम केलेले लाँग जॅकेट ट्राय करा.  रॉयल व तरीही सुटसुटीत लूक मिळेल. रफल, फ्रिल बॉर्डरचे लॉन्ग जॅकेटही इन आहेत. 


7. लाँग जॅकेट कधी स्लीव्हलेस तर कधी थ्री फोर्थ स्लीव्हज प्रकारात छान वाटते.  प्लेन पांढर्‍या कुर्ती-पायजम्यावर सौम्य निळ्या रंगाचे थ्री फोर्थ स्लीव्हजचे लाँग जॅकेट तुम्हाला शांत, कूल अनुभूती देते तर जीन्सवरील कुर्तीवर एथनिक कॉटन लाँग जॅकेट तुम्हाला कम्फर्ट देतो. 
8. इकत, फ्लोरल  प्रिंट,  स्ट्रिप्स, चेक्स, लेहरीया तसेच प्लेन लाँग जॅकेट कुर्तीजवर घातले तर ऑफिसवेअर कुर्तीही हटके लूक देते.  लाँग जॅकेट कुर्तीच्या या ट्रेंडची सुरु वात खरं तर पुन्हा एकदा 90 च्या दशकातीलच आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.   साजन चित्नपटात माधुरी दीक्षितने ‘बहोत प्यार करते है’ या गाण्यात घातलेला ड्रेस आठवा.  नाइंटीजमधील हा फॅशन मंत्रा  2020 च्या नव्या जमान्यातही फिट होऊ पाहतोय, हेच खरं. 

Web Title: sajan film madhuri dixit long kurta is back in fashion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.