-इरा. एन.जी.

स्टेम म्हणजेच सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथेमॅटिक्स या विद्याशाखा. या विद्याशाखांमध्ये महिलांचा सहभाग कमी आहे, अशी चर्चा कायमच होत असते. त्यातही या क्षेत्रात शोधनिबंध प्रकाशित करणं, या शाखांमध्ये कामासाठी पुरस्कार मिळणं, विद्यापीठांमध्ये प्राध्यापकपद मिळणं यामध्ये तर महिलांचं प्रमाण अत्यल्प आहे.  
पण यावर्षी दिल्या गेलेल्या नोबेल पुरस्कारांनी हे चित्र बदलत असल्याचा सुखद धक्का दिला आहे. या वर्षीचा रसायनशास्नतला नोबेल पुरस्कार फ्रान्सच्या इमॅन्युएल शापेन्टी आणि अमेरिकेच्या जेनिफर ए. डाउडना यांना दिला गेला, तर एन्ड्रिया गेज या  भौतिकशास्त्रातल्या नोबेल पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. 
रसायनशास्नतल्या नोबेलच्या सुरुवातीपासून आजर्पयत 185 जणांना हा पुरस्कार मिळाला आहे, यापैकी महिला आहेत केवळ 7. दोन महिलांना        विभागून रसायनशास्त्रातलं नोबेल मिळण्याची ही पहिलीच वेळ. इमॅन्युएल शापेन्टी आणि जेनिफर ए. डाउडना या जोडीला डीएनए एडिटिंगसाठी  अर्थात जनुकीय संपादनासाठी लागणारं तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला. 
  अमेरिका आणि फ्रान्स हे अटलांटिक महासागरावरील दोन टोकाचे देश; पण अमेरिकेतील जेनिफर ए. डाउडना आणि फ्रान्समधील इमॅन्युएल शापेन्टी या दोघींनी एका विषयावर काम केलं. आणि दोघींनाही या कामासाठी नोबेल मिळालं आणि तेही विभागून. नोबेलची इतिहासात याची विशेष नोंद झाली आहे. 
माणसाला होणा-याअनेक रोगांना कारणीभूत असतात ती त्याची जनुकं . म्हणजेच डीएनए. अशा रोगांवर औषधं असली तरी ती त्या रोगाच्या परिणामांवर होती. या रोगांच्या मुळार्पयत पोहोचून त्याचा इलाज करण्यात अजून यश आलं नव्हतं.  शापेन्टी आणि डाउडना यांच्या जनुकीय संपादन तंत्रवरच्या कामामुळे, या रोगाच्या मुळार्पयत पोहोचून त्याचा इलाज करणं   शक्य झालं आहे. आपल्या हव्या त्या ठिकाणी जनुकं कापण्याच्या तंत्रज्ञानामुळे जीवशास्नमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. 
 शापेन्टी या सध्या बर्लिनमधल्या ‘माक्स प्लांक’ या संस्थेमध्ये कार्यरत आहेत, तर डाउडना या अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात काम करतात. 2क्11 साली प्युरटोरिकोमधल्या एका परिषदेदरम्यान त्यांची ओळख झाली. तिथेच त्यांनी एकमेकींना कामामध्ये सहकार्य करण्याचं ठरवलं. यानंतर अनेक डिजिटल आणि प्रत्यक्ष भेटींमधून त्यांचं काम आकार घेऊ लागलं. 
सदोष जनुक काढून टाकण्याची किंवा आपल्याला हवा तो जनुक समाविष्ट करण्याची ही प्रक्रि या रेणवीय कात्र्यांच्या (जेनेटिक सिझर्स) मदतीनं पार पाडता येतं. सदोष जनुक काढून टाकले की, त्यामुळे निर्माण होणारे जनुकीय रोग पुढील पिढीत संक्रमित होत नाहीत. क्रिस्पर किंवा कॅस 9 या तंत्रज्ञानावर आधारित ही पद्धती प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांच्या जनुकांत बदल करण्यासाठी वापरता येते. या संशोधनामुळे अनेक आनुवंशिक रोग बरे करण्याचं स्वप्न साकार झालं. यामुळे सध्या जगात वाढत चाललेला कर्करोगही बरा करता येणं शक्य झालं आहे. इतकंच नाही तर कृषी क्षेत्रातही जनुकसंस्कारित पिकं  तयार करण्यासाठी या तंत्राचा उपयोग होणार आहे. यामुळे पिकांची मोठय़ा प्रमाणात होणारी नासाडी टळणार आहे.   

नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी कळताच डाउडना यांनी ‘वुमन रॉक’ असा संदेश पोस्ट केला. त्या म्हणतात, ‘अनेक  स्रियांना वाटतं, आपण जर पुरुष नसू तर आपल्या कामाची कोण दखल घेणार? आम्हा दोघींना मिळालेल्या पुरस्कारानं ही समजूत खोडायला नक्की मदत होईल! आज गाढ झोपेत असतांनाच मला पत्रकाराचा फोन आला आणि पहिल्यांदा दोन महिलांना विभागून रसायनशास्नचं नोबेल जाहीर झाल्याची बातमी मिळाली. ही बातमी महिलांमध्ये असणा-या अनेक गैरसमजांना ठोस उत्तर आहे. हा पुरस्कार हेच सांगतो की विज्ञान असू देत की रसायनशास्र.. महिला काहीही करू शकतात. या पुरस्काराचं महत्त्व म्हणूनच माझ्यासाठी खूप आहे.’  येत्या दहा लाख वर्षात असा क्षण कधीही अनुभवू शकणार नाही असं म्हणून डाउडना यांनी या पुरस्कार मिळाल्याबद्दलचा आनंद व्यक्त केला. तर शापेन्टी म्हणतात की  ‘मला अनेकदा लोकं म्हणायचे की तुला नक्कीच नोबेल मिळणार. पण जेव्हा ते प्रत्यक्ष मिळालं तेव्हा आश्चर्य तर वाटलंच आणि खरंच आहे ना, असा प्रश्नही पडला; पण आता हे सत्य आहे. आणि मला याची आता सवय करून घ्यावी लागेल. हा बहुमान दोन महिलांना मिळाला आहे याबद्दल खूपच आनंद वाटतो. पण इथे आमची ओळख पहिले शास्त्रज्ञ आहे आणि नंतर  महिला आहे. या पुरस्कारामुळे विज्ञानाची वाट चालू इच्छिणा-या तरुण मुलींना नक्कीच प्रेरणा मिळेल असा आशावाद शापेन्टी यांनी व्यक्त केला.


भौतिकशास्त्राचं नोबेल मिळवणा-या एन्ड्रिया गेज ह्या या विषयातलं नोबेल मिळवणा:या केवळ चौथ्या महिला ठरल्या आहेत. हा पुरस्कार याआधी मारी     क्युरी, मारिया मायर आणि डॉना स्टिकरलॅँड यांना मिळाला आहे. गेल्या अनेक दशकांपासून गेझ यांना तरुण मुलींचा आदर्श म्हणूनच ओळखलं जातं. गेज  यांचं लहानपण हाइड पार्कमध्ये गेलं. नासानं  अवकाशात अपोलो यान सोडलं तेव्हा गेज या      लहान होत्या. त्या गोष्टीचं त्यांना विलक्षण कौतुक वाटलं आणि त्यांच्यात  विज्ञानाची आवड निर्माण झाली.  1987 मध्ये अमेरिकेच्या  ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉनॉजी’मधून भौतिकशास्नत पदवी संपादन केल्यावर 1992 मध्ये कॅलटेकमधून पीएच.डी. पूर्ण केली. 
25 वर्षापूर्वी आपल्या आकाशगंगेच्या मधोमध एक कृष्णविवर आहे हे तपासून पाहण्यासाठी एन्ड्रिया गेज यांची धडपड सुरू झाली. सर्वात आधी आइनस्टाइननं कृष्णविवरांच्या अस्तित्वाची कल्पना केली होती. याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मग अनेक शास्त्रज्ञांचा हातभार लागला. कृष्णविवरांच्या  अस्तित्त्वाला  भौतिकशास्त्राच्या  ‘जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी’ जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केलं.    तर रेनहार्ड आणि गेज या दोघांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेलं अतिविशाल कृष्णविवर शोधून काढलं.


कृष्णविवरांचा परिणाम इतर ता-यांवर होतो, हा धागा पकडून रेनहार्ड गेन्झेल आणि एन्ड्रिया गेझ यांनी आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी धनू                तारकासमूहात एक कृष्णविवर शोधून काढलं. 199क् पासून त्यांचं हे संशोधन सुरू होतं. आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या ता-यांच्या कक्षांचा त्यांनी बारकाईनं अभ्यास केला. त्याचे नकाशे तयार केले. आपल्यापासून 25000प्रकाशर्वष दूर असणा-या या तारकसमूहाचा अभ्यास करणं किती कठीण असेल, याची कल्पनाच केलेली बरी. पण त्यांनी त्यासाठी 3,000 पेक्षा जास्त ता:यांचा अभ्यास केला. ता-यांना ओढणारा कुठलातरी पदार्थ असल्याचं त्यांना समजलं.  त्यामुळे   ता-यांच्या कक्षा बदलत होत्या. त्यातून हे सगळे एका कृष्णविवरामुळे घडत असल्याचं त्यांनी सांगितलं. या कृष्णविवराचं वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 40 लाख पट अधिक आहे. गेन्ङोल आणि गेज यांनी आंतरतारकीय वायू आणि धुळीतून हे कृष्णविवर शोधलं. त्यासाठी दुर्बिणीतून निरीक्षणं केली आणि तीही 25 वर्ष      
नोबेल मिळाल्यावर गेज म्हणाल्या, ‘नोबेल पुरस्काराच्या घोषणोनं मला खूप आनंद झाला आहे. भौतिकशास्नचं नोबेल मिळवणारी मी चौथी महिला शास्रज्ञ आहे याचं महत्त्व मी  काय ते मी ओळखून आहे. ‘या पुरस्कारानं आपल्यावरील जबाबदारी अधिकच वाढली असल्याचं गेज यांचं म्हणणं आहे.’   
इमॅन्युएल शापेन्टी, जेनिफर ए. डाउडना, एन्ड्रिया गेज किंवा यावर्षी साहित्याचं नोबेल मिळवणा-या  लुईस ग्लुक असू देत. जोर्पयत महिलांनी असे बहुमान मिळवणं आपल्याला विशेष वाटणार नाही, तोर्पयत अधिकाधिक स्रियांपुढे उदाहरण, ‘रोल मॉडेल’ उभं राहावं म्हणून आपल्याला अशी उदाहरणं सातत्यानं समोर आणावी लागणार आहेत. 

( लेखिका राजकीय आणि सामजिक विषयांच्या  अभ्यासक आहेत. ) 


reach.irang@gmail.com

 

 

Web Title: Rocking story of the immense work of Nobel prize winner scientists.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.