अगदी चमचाभर तेलही मोजून खाल्लं! कियारा अडवाणीच्या न्यूट्रिशनिस्टने सांगितलं परफेक्ट बिकिनी बॉडीचं सिक्रेट
Updated:August 1, 2025 15:15 IST2025-08-01T15:11:22+5:302025-08-01T15:15:42+5:30
Weight loss diet of celebrities: Celebrity nutritionist advice: Bollywood fitness and diet tips: सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट निकोल लिनहारेस केडिया यांनी पिंकव्हिलाच्या मुलाखतीत किआराचा डाएट प्लॅन सांगितला.

कियारा अडवाणीला नुकतीच मुलगी झाली आहे. नुकताच तिचा वॉर २ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून लवकरच चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तिची बॉडी आणि अॅक्शनमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली. कियाराने बॉडी टोन कशी केली. तिचा आहार कसा होता. याविषयी तिच्या न्यूट्रिशनिस्टने डाएट प्लॅनबद्दल सांगितले.(Weight loss diet of celebrities)
तिच्या फिट आणि स्लिम फिगरकडे पाहून तिने टोन बॉडीसाठी खूप मेहनत घेतली आहे. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट निकोल लिनहारेस केडिया यांनी पिंकव्हिलाच्या मुलाखतीत किआराचा डाएट प्लॅन सांगितला.(Celebrity nutritionist advice)
टीओआयच्या वृत्तानुसार पोषणतज्ज्ञ म्हणतात कियाराला घरातलं जेवण खायला अधिक आवडतं म्हणून तिने क्रॅश डाएट करण्याच टाळलं. तिने आहारात कॅलरीज कमी ठेवून मॅक्रोन्यूट्रिएंट्स वाढवले.
तिने शरीरातील चरबी कमी करणं आणि स्नायूंना टोन करण्यावर अधिक भर दिला. ज्यामुळे तिची फिगर अधिक आकर्षक दिसेल. तसेच शरीराला भरपूर ऊर्जा आणि ताकद मिळेल.
नाश्त्यामध्ये प्रोटीन पॅनकेक्स खाण्यास सुरुवात केली. जो ओट्स, नट्स आणि प्रोटीन पावडरपासून बनवलेला आहे. त्यात मेपल सिरप आणि फळांचा समावेश केला.
तिच्या दुपारच्या जेवणात पौष्टिक पदार्थांचा अधिक समावेश होता. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात ग्रील्ड चिकन, चिकन करी, शतावरी, बटाटे, एवोकॉडो, व्हेजिटेबल क्रुडिटेस यांसारखे पदार्थ खायला सुरुवात केली. यातून तिच्या शरीराला भरपूर पोषण मिळाले.
शरीराला ताकद मिळण्यासाठी तिने सत्तूचे ताक प्यायली. यामध्ये भाजलेले बेसन, जिरे पावडर आणि धण्याचा समावेश होता. या ड्रिंकमुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच भरपूर प्रोटिन मिळते.