Join us   

वजन कमी होतच नाही? ६ पदार्थ नियमित खा- वजनाचा काटा झरझर खाली येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 4:22 PM

1 / 8
वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या नेहमीच्या व्यायामासोबत आणि डाएटिंगसोबत हा एक सोपा उपायही करून पाहा...
2 / 8
वजन कमी करण्यासाठी आपण असे पदार्थ खाल्ले पाहिजेत, त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आणि फायबर मिळतील. असे पदार्थ आहारात असतील तर बराच वेळ पोटात काही नसेल तरी थकवा येत नाही. म्हणूनच अशा पद्धतीने वजन कमी करण्यासाठी मदत करणारे पदार्थ नेमके कोणते आहेत ते पाहूया...
3 / 8
यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे हिरव्या पालेभाज्या. सूप- सलाड या माध्यमातून हिरव्या पालेभाज्या अधिकाधिक प्रमाणात खा. कारण त्यांच्यामध्ये कॅलरी खूप कमी असतात आणि व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर भरपूर प्रमाणात असतात.
4 / 8
ब्राऊन राईस, ओट्स, बार्ली, बाजरी या धान्यांचं आहारातलं प्रमाण वाढवा. या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते.
5 / 8
बेरी प्रकारातल्या फळांमध्ये कॅलरी खूप कमी असतात आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
6 / 8
वेटलॉस करणाऱ्यांनी बदाम, अक्रोड खाण्यावर भर द्यावा. त्यांच्यात प्रोटिन्स, चांगले फॅट्स यांचं प्रमाण उत्तम असतं.
7 / 8
ॲव्हाकॅडो या फळामध्येही कॅलरी असल्या तरी वेटलॉससाठी हे फळ मदत करतं. कारण त्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात.
8 / 8
ग्रीक योगर्ट हा पदार्थही वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
टॅग्स : वेट लॉस टिप्सअन्न