महिन्याभरात वजन होईल झरकन कमी! रोजच्या आहारात खा आयुर्वेदिक ५ गोष्टी, पोटाचा घेर राहिल नियंत्रणात
Updated:May 25, 2025 17:05 IST2025-05-25T17:00:00+5:302025-05-25T17:05:02+5:30
Ayurvedic herbs for weight loss: Belly fat reduction herbs: Ayurvedic weight loss tips: वजन कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही आयुर्वेदिक पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास आपल्याला आराम मिळेल.

आजच्या काळात वजन वाढण्याची समस्या ही अगदी सामान्य आहे. यामध्ये सततचा ताण, बदलेली जीवनशैली, असंतुलित आहार, जंकफूड याचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो परंतु काही केल्या आपले वजन काही कमी होत नाही. (Ayurvedic herbs for weight loss)
वजन कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही आयुर्वेदिक पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास आपल्याला आराम मिळेल. इतकेच नाही तर आपले वजन देखील लगेच कमी होईल. (Belly fat reduction herbs)
त्रिफळा नियमितपणे पाण्यात घेतल्याने पचनसंस्था सुरळीत होण्यास मदत करते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. चयापचय वाढवण्यासह बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. (Ayurvedic weight loss tips)
गुगळ हे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते. ही औषधी वनस्पती आपल्या थॉयरॉईड ग्रंथीना सक्रिय करुन चयापचय वाढवतो. ज्यामुळे वजन कमी होते.
मेथी दाण्यामध्ये भरपूर फायबर असते. जे आपली भूक नियंत्रित करण्यास मदत करते. या औषधी वनस्पतीमुळे पचन सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.
अश्वगंधा आपला ताण हलका करण्यास मदत करते. अधिकचा ताण घेतल्याने वजन वाढते. अशावेळी अश्वगंधा खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहू शकते.
दालचिनीमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे घटक आहेत. ही औषधी वनस्पती इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते. चयापयच वाढून वजन कमी होते.