1 / 14प्रत्येक नवरीसाठी लग्नाचा दिवस हा तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो. या दिवशी (trending nauvari saree colours for maharashtrian bride) तिचा लुक पारंपरिक आणि तितकाच हटके असावा अशी प्रत्येक होणाऱ्या नवरीची इच्छा असते. याच इच्छेला पूर्ण करणारी, महाराष्ट्राची शान असलेली नऊवारी साडी सध्या फॅशन ट्रेंडमध्ये पुन्हा एकदा बहरून आली आहे... 2 / 14लग्नाच्या पारंपरिक विधी दरम्यान बहुतेकजणी नऊवारी साडीच नेसणे (trending nauvari saree colours 2025) पसंत करतात. अशावेळी पारंपरिक लाल, मरून अशा रंगांच्या पलीकडे जाऊन, यंदाच्या लग्नसराईत नऊवारी साडीच्या रंगांमध्ये एक नवीन आणि आकर्षक ट्रेंड पाहायला मिळतोय. जर तुम्ही यंदा नवरी म्हणून नऊवारी साडी नेसणार असाल, तर क्लासिक रंगांसोबतच 'पेस्टल आणि सॉफ्ट शेड्स', तसेच 'बोल्ड आणि हटके कलर्स'चा ट्रेंड तुम्हाला नक्कीच भुरळ पाडेल. 3 / 14मराठमोळ्या लग्नात नऊवारी साडीचा थाट काही औरच असतो! परंपरा आणि आधुनिकता ( best colours for nauvari saree) यांचा सुंदर संगम साधत, यंदाच्या लग्नसराईत नवरीसाठी नऊवारी साडीचे हे खास रंग ट्रेंडमध्ये आहेत, जे तुम्हाला एक खास लुक देतील. तुम्हाला रॉयल, एलिगंट किंवा अगदी सॉफ्ट आणि सोबर लुक हवा असेल तर नेमकी कोणत्या रंगाची निवड करावी ते पाहूयात... 4 / 14केशरी रंग महाराष्ट्रात नवरीसाठी शुभ मानला जातो. हा रंग उत्साह आणि पारंपरिकता दर्शवतो. केशरी रंगाच्या वेगवेगळ्या छटा असणाऱ्या रंगाची नऊवारी साडी अधिक जास्त शोभून दिसेल. 5 / 14मरून रंग नेहमीच नवरीला ‘रॉयल’ लुक देतो. गोल्डन बॉर्डरसोबत हा रंग अधिक पारंपरिक आणि आकर्षक दिसतो. मरून रंगाच्या नऊवारीवर कॉपर गोल्ड जरतारीचे काम अधिक उठून दिसते.6 / 14हा रंग नववधूला खास आकर्षक आणि उत्साही, फ्रेश लुक देतो. या रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज खूप सुंदर दिसतो.7 / 14मिंट ग्रीन हा फिकट हिरवा रंग सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. पारंपरिक हिरव्या रंगापेक्षा हा अधिक हटके, स्टायलिश आणि शांत लुक देतो.8 / 14मराठमोळी नवरी म्हणजे लाल रंग तर हवाच. गडद लाल किंवा टोमॅटो रेड रंगाची भरजरी पैठणी नऊवारी, त्यावर मोहनमाळ, ठुशी, नथ असे पारंपरिक सोन्याचे दागिने घातल्यास नवरीचा लूक खुलून येतो. 9 / 14पिंक रंगामध्ये गडद रंगांच्या वेगवेगळ्या छटांसोबतच ‘डस्टी पिंक’ किंवा ‘ब्लश पिंक’ यांसारखे सॉफ्ट गुलाबी रंग नवरीला सुंदर लूक देतात. चांदीच्या किंवा डायमंडच्या दागिन्यांसोबत अशा पिंक रंगाची नऊवारी साडी खूपच मोहक दिसते. 10 / 14रॉयल ब्लू हा शाही आणि तेजस्वी रंग. या रंगाची नऊवारी साडी नवरीच्या लूकला अधिक खास, आकर्षक व सुंदर करते. चंदेरी जरतारीच्या कामामुळे रॉयल ब्लू नऊवारी साडी अधिक खुलून दिसते. 11 / 14 जांभळा आणि वायलेट या रंगाची नऊवारी साडी नवरीला अधिक जास्त शोभून दिसते. कॉन्ट्रास्टमध्ये सोनेरी किंवा केशरी रंगाचा ब्लाऊज घातल्यास लूक अधिकच हटके दिसतो. 12 / 14पिवळ्या रंगाची साडी तर प्रत्येक पारंपरिक लग्नात हमखास नेसली जातेच. परंतु आपण नेहमीचा तोच तो कॉमन पिवळा रंग निवडण्यापेक्षा पिवळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा असणाऱ्या नऊवारी साडीची निवड करु शकता. 13 / 14हे रंग पारंपारिक असले तरी, त्यांची फॅशन कधीच जुनी होत नाही. आधुनिक डिझाईन्स आणि भरजरी कामामुळे ते आजही खास आहेत.14 / 14हा उबदार आणि लूक खुलवणारा रंग नवरीला एक फ्रेश लुक देतो. या रंगांच्या नऊवारी साडीवर मोत्याचे दागिने किंवा डायमंडचे दागिने जास्त शोभून दिसतात.