Join us

नव्या नवरीसाठी डायमंड मंगळसूत्राच्या सुंदर नाजूक डिझाइन्स! कमी वजनाचे डेलिकेट पॅटर्न- स्टायलिश लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2025 21:30 IST

1 / 8
नुकतच लग्न झालेल्या नवरीसाठी खास आणि महत्त्वाचा दागिना असतो ते तिचं मंगळसूत्र. ऑफिस किंवा प्रवासात अनेकदा हे लांबलचक, मोठं मंगळसूत्र घालताना आपल्या संकोच वाटतो. जर आपण वर्किंग वूमन असाल आणि कमी वजनाचे डेलिकेट पॅटर्न शोधत असाल तर या मंगळसूत्राच्या डिझाइन्स ट्राय करा.(Diamond mangalsutra designs)
2 / 8
कमी वजनाचे हलके- फुलके डायमंड मंगळसूत्र तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालतील. (Lightweight mangalsutra)
3 / 8
आपण काळ्या आणि सोन्याचे मणी असणारे मंगळसूत्र घालू शकतो. यात मण्यांवर डायमंडचे कोरवी काम केलेले असते. सोन्याच्या चेनमध्ये ओवलेल हे पॅटर्न दिसायला सुंदर आहे.
4 / 8
ऑफिसवेअरसाठी हिऱ्याचे किंवा गोल ओव्हल सोन्याच्या डिझाइनसह एक लहान पेंडेंट छान दिसेल. पातळ आणि नाजूक साखळी असणारे मंगळसूत्र आपल्या सौंदर्यात अधिक भर घालेल.
5 / 8
त्रिकोणी किंवा चौकोनी आकाराचे पेंडेंट. हे काळ्या मण्यांसह बारीक साखळी मॉर्डन लूक देईल. सध्या हे डिझाइन खूप ट्रेंडी आहेत.
6 / 8
दोन लेअरच साखळी मंगळसूत्र. यामध्ये छोटा आणि मोठा डायमंड आपल्या पाहायला मिळले. बारीक चेनमध्ये काळे मणी आणि त्यात चमकणारा डायमंड आपल्या गळ्याची शोभा वाढवेल.
7 / 8
सोन्याचे पेंडेंट हे पारंपरिक आणि पाश्चात्य शैलीचे मिश्रण. सध्या अशा डिझाइन्स खूप ट्रेंडमध्ये आहे.
8 / 8
मंगळसूत्र घालायला न आवडणाऱ्यांसाठी ब्रॅसलेट हा देखील चांगला पर्याय आहे. यात विविध डायमंडच्या डिझाइन्स पाहायला मिळतील.
टॅग्स : फॅशनमहिला