1 / 7लग्नसमारंभ, रिसेप्शन, वाढदिवस किंवा ऑफिस पार्टी. प्रसंग कोणताही असला तरी प्रत्येक महिलेला आपला लूक परफेक्ट हवा असतो. पण अनेकदा मोठी अडचण असते. आपण फॅन्सी, जड किंवा महागडा ड्रेस न घालता देखील स्टायलिश, एलिगंट आणि लक्ष वेधून घेणारा लूक कसा मिळवायचा. (fancy dress ideas)2 / 7सध्या फॅशनमध्ये “लाइटवेट पण रॉयल” ही ट्रेंडिंग मागणी आहे. म्हणजेच आरामदायी, हलके आणि तरीही आकर्षक दिसणारे फॅशन पर्याय. जर आपल्यालाही पार्टी किंवा लग्न समारंभात फॅन्सी पण देसी लूक हवा असेल तर या पद्धतीचे कपडे ट्राय करा.(wedding outfit ideas) 3 / 7लग्न किंवा रिसेपशनसाठी आपण लेहेंगा ट्राय करु शकतो. यावर आपण आपल्या आवडीचे दागिने घालून कॉन्ट्रास्ट लूक देऊ शकतो. 4 / 7पर्शियन सलवार सूट ट्रेंडमध्ये आहे. या पद्धतीचे ड्रेस मुलींना शोभून दिसतात. असे ड्रेस घालायला देखील हलके आणि कम्फर्टेबल असतात. 5 / 7लग्न समारंभात आपण डिझायनर पलाझो सूट निवडू शकता. यावर पूर्णपणे एम्ब्रायडरी केलेली असते. आपल्याला यावर स्टेटमेंट ज्वेलरीचा पर्याय चांगला वाटेल. 6 / 7आपल्याला मित्राच्या किंवा फॅमिली फंक्शनमध्ये जायचे असेल तर भरजरी ड्रेस निवडा. ऑफ व्हाइट आणि गोल्डन रंगाचे कॉम्बिनेशन छान दिसते. हा आपल्याला रिच लूक देईल. 7 / 7शरारा आणि शॉर्ट कुर्ती सध्या ट्रेंडमध्ये आहे. जर आपली उंची छोटी असेल तर आपण सारख्या रंगाचे कपडे सिलेक्ट करु शकतो. त्यावर कॉन्ट्रास्ट ज्वेलरी निवडू शकता.