Join us

लग्नात हळदी समारंभासाठी खास डायमंड ज्वेलरी, ५ ट्रेंडी पॅटर्न- साडी असो किंवा ड्रेस, नव्या नवरीचे रुप दिसेल खुलून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2025 21:20 IST

1 / 6
लग्न समारंभातील पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा क्षण हळदी. पिवळ्या रंगाचा साजश्रृंगार, त्यावर साजेसा मेकअप आणि नवरीचे ते सुंदर रुप. फुलांचे डेकोर आणि पारंपारिक विधी या सगळ्यात नवरीची ज्वेलरी तिच्या लुकला एक वेगळंच तेज देते. (Haldi ceremony jewellery)
2 / 6
आजकाल हळदीसाठी पारंपारिक सोन्याऐवजी हलकी, आकर्षक आणि ब्राइट डायमंड ज्वेलरी ट्रेंडमध्ये आहे. सध्या कॉन्ट्रास्ट ज्वेलरीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. फुलांच्या ज्वेलरीपेक्षा ही डायमंड ज्वेलरी नवरीच्या रुपाला अधिक खास बनवते. पाहूया ट्रेंडी पर्याय (Diamond jewellery for brides)
3 / 6
जर पिवळ्या रंगाच्या साडीवर पिवळी ज्वेलरी घालण्याऐवजी आपण हिरव्या रंगाचा चांदीचा प्लेटेड नेकलेस सेट घालू शकतो.
4 / 6
हळदी समारंभात स्टायलिश लूक हवा असेल तर मल्टी कलर गोल्ड प्लेटेड नेकलेस सेट ट्राय करा.
5 / 6
हळदीच्या या खास सोहळ्यात आपले सौंदर्य वाढवायचे असेल तर पांढऱ्या रंगाचा सोन्याचा मुलामा असलेला नेकलेस सेट घालू शकता.
6 / 6
सध्या पिवळ्या साडी किंवा ड्रेसवर पोल्की वधूचा हार सेट खूप ट्रेंडमध्ये आहे.
टॅग्स : फॅशनशुभविवाहमहिला