1 / 6लग्नाची तयार करताना आपण मेकअप, ज्वेलरी आणि कपड्यांची काळजी घेतो पण हेअरस्टाईलकडे मात्र दुर्लक्ष करतो. पण ब्रायडल लूकमध्ये एक छोटासा लूक देखील आपला सर्व लक्ष वेधून घेते. ती म्हणजे हेअरस्टाईल आणि त्यात लावलेला हेअर ब्रोच. 2 / 6ब्रायडल लूकमध्ये आपल्याला रॉयल टच, एलिगंट लूक हवा असेल तर आपण हेअर ब्रोचेस वापरु शकतो. आपले देखील केस लहान किंवा लांबसडक असतील तर हे ५ ट्रेडिंग हेअर ब्रोच नक्की ट्राय करा. 3 / 6आपण कुंदनची ज्वेलरी घातली असेल तर कुंदन हेअर ब्रोच सुंदर दिसेल. हा ब्रोच लहान किंवा मोठ्या केसांना छान दिसेल. 4 / 6सध्या टेम्पल ज्वेलरीमधील हेअर ब्रोचदेखील उपलब्ध आहेत. आपले केस लांब असतील तर हे शोभून दिसेल. 5 / 6आपली वेणी लांब असेल तर केसांसाठी आपण चंद्रवाली ब्रोच वापरु शकतो. यावर डायमंड आणि मोत्याचे वर्क करु शकतो. 6 / 6आपण केसांची वेणी घालून त्यावर ब्रोच लावू शकतो. तसेच कानात चेन घालून ते केसांमध्ये अडकवू शकतो.