लग्नात नवरीची हेअरस्टाइल सजवणारे ५ जबरदस्त स्टायलिश हेअर ब्रोच- नजर हटू नये इतके सुंदर आणि स्पेशल
Updated:November 17, 2025 18:27 IST2025-11-17T17:57:43+5:302025-11-17T18:27:19+5:30
bridal hair accessories: hair brooch designs: wedding hair accessories: केस लहान किंवा लांबसडक असतील तर हे ५ ट्रेडिंग हेअर ब्रोच नक्की ट्राय करा.

लग्नाची तयार करताना आपण मेकअप, ज्वेलरी आणि कपड्यांची काळजी घेतो पण हेअरस्टाईलकडे मात्र दुर्लक्ष करतो. पण ब्रायडल लूकमध्ये एक छोटासा लूक देखील आपला सर्व लक्ष वेधून घेते. ती म्हणजे हेअरस्टाईल आणि त्यात लावलेला हेअर ब्रोच.
ब्रायडल लूकमध्ये आपल्याला रॉयल टच, एलिगंट लूक हवा असेल तर आपण हेअर ब्रोचेस वापरु शकतो. आपले देखील केस लहान किंवा लांबसडक असतील तर हे ५ ट्रेडिंग हेअर ब्रोच नक्की ट्राय करा.
आपण कुंदनची ज्वेलरी घातली असेल तर कुंदन हेअर ब्रोच सुंदर दिसेल. हा ब्रोच लहान किंवा मोठ्या केसांना छान दिसेल.
सध्या टेम्पल ज्वेलरीमधील हेअर ब्रोचदेखील उपलब्ध आहेत. आपले केस लांब असतील तर हे शोभून दिसेल.
आपली वेणी लांब असेल तर केसांसाठी आपण चंद्रवाली ब्रोच वापरु शकतो. यावर डायमंड आणि मोत्याचे वर्क करु शकतो.
आपण केसांची वेणी घालून त्यावर ब्रोच लावू शकतो. तसेच कानात चेन घालून ते केसांमध्ये अडकवू शकतो.