1 / 7सध्या सुट्टीचे दिवस आहेत त्यामुळे आपण कुटुंबासोबत बाहेर फिरायला जातो. अशावेळी पर्याय म्हणून हॉटेलमध्ये राहतो. हॉटलेच आरामदायी वातावरण, रुम्स आणि तिथे मिळणाऱ्या वातावरणामुळे आपल्याला ती जागा अधिक आवडू लागते.(free items in hotel rooms) 2 / 7अनेकदा हॉटेलमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला अधिक आवडतात. किंवा आपण सरळ घरी घेऊन जाऊ शकतो. हॉटेल्समध्ये अशा काही वस्तू असतात ज्या खास तिथल्या गेस्टसाठी असतात. पाहूयात हॉटेलमधून कोणत्या वस्तू चोरुन घरी आणण्याऐवजी थेट आणू शकतो. (what can I take from a hotel room)3 / 7आपण चांगल्या हॉटेलमध्ये राहतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला अनेक सुविधा मिळतात. बाथरुममध्ये शाम्पू, कंडिशनर, बॉडी वॉश आणि यांसारखे अनेक वस्तू मिळतात. या वस्तू आपण घरी घेऊन येऊ शकतो. कारण या वस्तू या प्रत्येक गेस्टला दिल्या जातात. 4 / 7हॉटेलच्या बाथरुममध्ये चप्पल असतात ज्या आपण घरी घेऊन जाऊ शकतो. किंवा प्रवासादरम्यान त्याचा पुन्हा वापर करु शकतो. 5 / 7हॉटेलमध्ये काही स्टेशनरचे सामान आपल्या रुममध्ये ठेवलेले असते. यामध्ये पेन, नोटपॅड किंवा पोस्टकार्ड असतं. या वस्तू प्रत्येक गेस्टला दिल्या जातात. चोरुन आणण्याऐवजी आपण ते घरी घेऊन येऊ शकतो. 6 / 7रुम्समध्ये इन्स्टंट बनवता येतील असे पदार्थ असतात. ज्यामध्ये कॉफी, टी बॅग्ज आणि साखरेचे पाऊच असते. ही छोटी पॅकेट्स आपण बॅगमध्ये ठेवू शकतो. ज्याचा आपल्याला पुढच्या प्रवासात उपयोग करता येतो. 7 / 7जर आपण महागडे हॉटेल सिलेक्ट केले असेल तर आपल्याला खास ट्रिटमेंट मिळते. यामध्ये शिलाई किट, शॉवर कॅप्स आणि शू शाईन किट सारख्या गोष्टी सुद्धा मिळतात. त्या आपल्याला दैनंदिन आयुष्यात उपयुक्त असल्यामुळे आपण त्यांना घरी घेऊन येऊ शकतो.