घरातीलच 'या' ६ वस्तूंनी करा लाकडी फर्निचर वॉटरप्रूफ- विसरा महागडे खर्चिक उपाय - काम स्वस्तात...

Updated:July 3, 2025 13:50 IST2025-07-03T13:32:24+5:302025-07-03T13:50:19+5:30

Monsoon Furniture Care Tips & Tricks : Wooden Furniture Protection From Humidity In Monsoon : 6 Easy Ideas To Protect Indoor Wooden Furniture During The Rainy Season : 6 Ways To Take Care Of Your Wooden Furniture During Rainy Season : पावसात लाकडी फर्निचर घरच्याघरीच वॉटरप्रूफ करण्यासाठी खास टिप्स लक्षात ठेवा...

घरातीलच 'या' ६ वस्तूंनी करा लाकडी फर्निचर वॉटरप्रूफ- विसरा महागडे खर्चिक उपाय - काम स्वस्तात...

पावसाळ्यात ओलाव्याने घरातील विशेषतः लाकडी वस्तूंचे फार (Monsoon Furniture Care Tips & Tricks) मोठे नुकसान होते. या ऋतूंत वातावरणातील दमटपणा, ओलावा हा लाकडी फर्निचरसाठी धोकादायक (Wooden Furniture Protection From Humidity In Monsoon) ठरु शकतो. पावसाळ्यात शक्यतो ओलाव्याने लाकडी फर्निचर फुगणे, सडणे किंवा रंग खराब होणे अशा समस्या उद्भवतात. महागडे आणि घराला शोभून दिसेल असे लाकडी फर्निचर आपण मोठ्या हौसेने घेतो पण पावसाळ्यात ते ओलाव्याने खराब होतेच.

घरातीलच 'या' ६ वस्तूंनी करा लाकडी फर्निचर वॉटरप्रूफ- विसरा महागडे खर्चिक उपाय - काम स्वस्तात...

पावसाळ्यात लाकडी फर्निचर खराब होऊ नये किंवा ते फुगू (6 Ways To Take Care Of Your Wooden Furniture During Rainy Season) नये यासाठी आपण काही घरगुती सोप्या उपायांचा वापर करु शकतो. घरगुती उपायांनी आपण सहज लाकडी फर्निचरला वॉटरप्रूफ करून त्यांना खराब होण्यापासून वाचवू शकतो. यंदाच्या पावसात लाकडी फर्निचर घरच्याघरीच वॉटरप्रूफ करण्यासाठी काही टिप्स पाहूयात.

घरातीलच 'या' ६ वस्तूंनी करा लाकडी फर्निचर वॉटरप्रूफ- विसरा महागडे खर्चिक उपाय - काम स्वस्तात...

सर्वात आधी घरातील फर्निचर ओलाव्यापासून दूर ठेवा. खिडक्या, बाल्कनी किंवा बाथरूमच्या दरवाज्याजवळ ठेवलेलं फर्निचर तिथून हलवून त्यांची जागा बदला. याशिवाय, पावसाळ्यात शक्यतो खिडक्या बंद ठेवा किंवा तुम्ही हवे असल्यास खिडक्यांना थोडे जाड पडदे लावू शकता.

घरातीलच 'या' ६ वस्तूंनी करा लाकडी फर्निचर वॉटरप्रूफ- विसरा महागडे खर्चिक उपाय - काम स्वस्तात...

नेफ्थलीनच्या गोळ्या कपड्यांना चांगले व सुरक्षित ठेवण्यासोबतच फर्निचरला देखील उंदीर, वाळवी आणि ओलावा लागण्यापासून वाचवतात. त्यामुळे नेफ्थलीनच्या गोळ्या आपल्या लाकडी कपाटात आणि इतर लाकडी फर्निचरच्या आत नक्की ठेवा. यामुळे ओलावा रोखता येतो आणि फर्निचर पावसाळ्यात देखील सुरक्षित राहते.

घरातीलच 'या' ६ वस्तूंनी करा लाकडी फर्निचर वॉटरप्रूफ- विसरा महागडे खर्चिक उपाय - काम स्वस्तात...

पावसाळ्यात लाकडी फर्निचर खराब होऊ नये म्हणून त्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं, म्हणून त्यावर वेळोवेळी पॉलिश करून घ्या. यामुळे फर्निचर दीर्घकाळ नव्यासारखेच दिसतात आणि पावसाळ्यातील ओलावा आणि वाळवीपासून त्यांचं संरक्षण होण्यास मदत होते.

घरातीलच 'या' ६ वस्तूंनी करा लाकडी फर्निचर वॉटरप्रूफ- विसरा महागडे खर्चिक उपाय - काम स्वस्तात...

लाकडी कपाट, खुर्च्या, सोफा सेट यात सुकी कडुलिंबाची पानं ठेवू शकता. ही पानं ओलावा शोषण्यास मदत करतात आणि बुरशी व की कीड लागण्यापासून फर्निचरचं संरक्षण करतात.

घरातीलच 'या' ६ वस्तूंनी करा लाकडी फर्निचर वॉटरप्रूफ- विसरा महागडे खर्चिक उपाय - काम स्वस्तात...

कडुलिंबाच्या पानांप्रमाणेच कापूरच्या वड्या देखील पावसाळ्यात लाकडी वस्तूंचे ओलाव्यापासून संरक्षण करतात. कापूराच्या वड्या आपण कपाटात ठेवू शकता. यामुळे कपाटात ओला कुबट वास येणार नाही.

घरातीलच 'या' ६ वस्तूंनी करा लाकडी फर्निचर वॉटरप्रूफ- विसरा महागडे खर्चिक उपाय - काम स्वस्तात...

फर्निचरवर अँटी-टर्माइट स्प्रेची फवारणी करा, यामुळे वाळवी लागण्याचा धोका कमी होतो आणि फर्निचर सुरक्षित राहतं. ज्या ठिकाणी वाळवी लागण्याची शक्यता जास्त असते, तिथे या स्प्रेचा वापर अवश्य करा.