1 / 8इंडिगो विमान घोळामुळे देशभरात प्रवाशांचे अक्षरश: हाल होत आहेत. विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले. कुणाकडे परतीचा मार्ग नव्हता ना पुढचा पर्याय होता. विमान रद्द झालं, पण त्यात अडकून पडलेली माणसं कोण होती, त्यांची गरज काय होती, त्यांची घाई किती महत्त्वाची होती. हे मात्र कोणालाच दिसेना. आणि देशभर हाहाकार सुरू असताना, यंत्रणा शांतच.. असे का?2 / 8इंडिगोच्या सावळ्या गोंधळामुळे कुणाला आपलं लग्न थांबवाव लागलं, कुणाला ऑनलाइन रिसेपशन पार्टी अटेंड करावी लागली तर कुणाचा मृतदेह अडकला. इतकेच नाही तर मुलांच्या परीक्षेच्या संधी देखील हुकल्या ज्यामुळे अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. इंडिगोच्या गैरव्यवस्थेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अशातच सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. 3 / 8एक तरुण म्हणतो माझं लग्न आहे, मी नवरदेव आहे, पण मी माझ्या लग्नाला जाऊ शकत नाही. फ्लाइट रद्द झाल्यामुळे मला स्वत: च्या लग्नात जाता येत नाहीये. कर्नाटकमधील हुबळी येथील नवविवाहित जोडप्याला व्हिडिओ कॉलद्वारे आपल्याच रिसेप्शन पार्टीला उपस्थित राहावं लागलं. 4 / 8इतकंच नाही तर एका मुलाचा मृतदेह सुद्धा इंडिगोच्या गैरव्यवस्थेमुळे अडकून राहिला. इंडिगोने अचानक उड्डाणे रद्द केल्याने मृतदेह शवाघरात परत आणवा लागला अशी कुटुंबाने तक्रार केली आणि पुन्हा फॅमिलीची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करणं तसेच पर्यायी पर्याय शोधणे हे निराशाजनक चक्र सुरू झाले.5 / 8एका विद्यार्थाने सांगितलं, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ साठी आमची निवड झाली, तिथे सुमारे ७४,००० कल्पना सादर करण्यात आल्या आणि जवळजवळ १४०० कल्पना निवडण्यात आल्या. आमचे केंद्र नॉर्थ-ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी होते आणि आम्हाला तिथे सादरीकरण करायचे होते पण फ्लाइट रद्द झाल्यामुळे आमची संधी हुकली. 6 / 8एका विदेशी महिलेने काउंटरची खिडकी पकडून होणाऱ्या गैरसोयीबाबत आक्रोश केला आणि विमान कंपनीकडे जाब विचारला. कंपनीकडून मुलभूत सुविधा मिळू शकल्याने प्रवासी संतप्त झाले आहे. 7 / 8एका वडिलांनी आपल्या मुलीला अचानक मासिक पाळी आल्यामुळे आक्रोश केला. मला सॅनिटरी पॅड द्या, माझ्या मुलीला गरज आहे. पण इंडिगो विमान कंपन्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 8 / 8अनेकांचे कार्यक्रम, मुलांच्या परीक्षा, भावना किंवा आयुष्यातील मोठे निर्णय एका कंपनीच्या गैरव्यवस्थेमुळे उद्ध्वस्त झाले. फ्लाइट रद्द होऊ शकतात, पण व्यवस्थापन रद्द होत असेल, तक्रारी ऐकणारे कोणीच नसेल, माहिती देण्याची जबाबदारी नसेल तर प्रवाशांचे हाल होतच राहणार.