1 / 8IPL म्हणजेच क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. त्यातही फॅन भयंकर पॅशनेट असतात. भांडतात-नाचतात-हसतात-रडतात. प्रत्येक यश अपयश पर्सनली घेतात. त्यातही आरसीबी फॅन्स सध्या सगळ्यात खुश आहेत कारण ते फायनलला पोहचले आहेत. आणि विराट कोहली गेल्या १८ वर्षांपासून ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पाहतोच आहे. 2 / 8विराट कोहली खेळत असताना त्याची पत्नी, अनुष्का शर्मा (Who is the woman next to Anushka Sharma during last night's IPL match) व्हीआयपी स्टॅण्डमध्ये दिसते. त्यांच्यातलं प्रेम अतिशय मोहक आहे. यावेळी मात्र गेले दोन सामने अनुष्का शर्माच्या शेजारी बसलेली महिला नेमकी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. नेटकऱ्यांनी सोशल मिडीयावर तिची ओळख शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात तिच्या वागण्यानं तिच्यावर टिकाही झाली.3 / 8खरंतर, अनुष्का शर्माच्या शेजारी बसलेली महिला दुसरी - तिसरी कुणी नसून तिची जुनी आणि खास मैत्रीण मालविका नायक (Malvika Nayak) आहे. ती अनुष्काची खूप जवळची जिवलग मैत्रीण असल्याचं काही बातम्या सांगतात.4 / 8मालविका आणि अनुष्का यांची मैत्री कॉलेजच्या दिवसापासूनची आहे, कारण दोघीही Mount Carmel College, Bangalore येथून शिक्षण घेत होत्या. मालविका अनेकवेळा अनुष्कासोबत मॅच पाहायला येते. त्या दोघी अनेकदा एकत्र सामने पाहतात किंवा त्यांच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला देखील जातात. 5 / 8मालविका नायकच्या LinkedIn प्रोफाइलनुसार, ती उच्च शिक्षित एमबीए पदवीधर आहे. ती बिझनेस डेव्हलपमेंट क्षेत्रात काम करते. तिने तिचे उच्च शिक्षण मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन मधून पूर्ण केले आहे. ती सध्या एका खासगी कंपनीमध्ये कार्यरत आहे.6 / 8मालविका नायक ही विवाहित असून निखिल सोसले याच्याशी तिचा विवाह झाला आहे. निखिल एका प्रतिष्ठित कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. दोघेही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असून, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात अॅक्टिव्ह आहेत.7 / 8लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध आरसीबीच्या अलिकडेच झालेल्या सामन्यात, मालविका नायकने ऋषभ पंतला 'stupid' म्हटलं असे व्हिडिओ व्हायरल झाले. ऋषभ पंतने शतकं पूर्ण केले, याचा आनंद व्यक्त करताना पंतने थेट ग्राउंडवरच कोलांटी उडी मारल्याचे सगळ्यांनीच पाहिले. त्याच्या या उत्साही रिअॅक्शनला पाहून तिने ऋषभ पंतला 'stupid' म्हटलं अशी चर्चा झाली.8 / 8तिने दिलेली ही प्रतिक्रिया नेमकी ऋषभ पंतसाठीच होती की मैत्रिणींमध्ये काही वेगळा विषय सुरु होता हे कळायला मार्ग नाही. पण सध्या ही मालविका कोण याच उत्सुकतेनं अनेकांनी गुगल आणि चॅटजीपीटी धारेवर धरलं.