Join us
Daily Top 2 Weekly Top 5

तू खिंच ऐसी फोटो..! कपल्ससाठी १० रोमॅण्टिक फोटो पोझ आयडिया, तुमचीही जोडी दिसेल विराट अनुष्कासारखी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2026 17:03 IST

1 / 15
सध्या लग्नसराईचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. लग्न म्हटलं की सुंदर कपडे, सजावट, विधी आणि आनंदी क्षण यांच्यासोबतच एक गोष्ट हमखास असते ती म्हणजे जोडप्याचे कपल फोटोशूट...आयुष्यातील सर्वात खास दिवस कायम आठवणीत राहावा (Romantic Wedding Couple Poses) म्हणून नवीन जोडपं फोटोशूटला विशेष महत्त्व देतात. मात्र कॅमेऱ्यासमोर उभं राहिल्यावर “नेमकी कोणती पोझ द्यायची?” हा प्रश्न अनेक जोडप्यांना पडतो आणि आयत्यावेळी थोडा गोंधळही उडतो.
2 / 15
पण काळजी करू नका! तुमचे हे खास क्षण केवळ फोटो नसून ती (wedding couple photoshoot poses) आयुष्यभराची आठवण ठरावी, यासाठी काही खास 'मस्ट ट्राय' फोटो पोझेस. मग ते प्री-वेडिंग असो, लग्नाचा मांडव असो किंवा रिसेप्शनचा थाट; या पोझेस तुमच्या फोटोंना अधिक आकर्षक, सुंदर, मेमोरेबल करतील सोबतच सोशल मिडियावरही तुमच्याच फोटोंची चर्चा होईल...
3 / 15
लग्नसोहळ्यातील फोटोग्राफीमध्ये 'हँड होल्ड शॉट' (Hand Hold Shot) हा सर्वात क्लासिक आणि मोहक प्रकार मानला जातो. नवरी पुढे चालत आहे आणि तिने नवरदेवाचा हात मागे पकडला आहे, किंवा दोघांनी एकमेकांचे हात अशा प्रकारे पकडणे की नवरीच्या हातातील मेहंदी आणि दोघांच्या लग्नाच्या अंगठ्या स्पष्ट दिसतील. एकमेकांचे हात हातात गुंफून, एकमेकांकडे बघत चालतानाची पोझ...हा फोटो दोन जीवांच्या एकत्र येण्याचे आणि आयुष्यभराच्या साथीचे प्रतीक असते.
4 / 15
लग्नाच्या फोटोशूटमध्ये केवळ गंभीर किंवा रोमँटिकच नाही, तर तुमच्यातील निखळ मैत्री आणि आनंद दर्शवणारे 'प्लेफुल कॅन्डिड शॉट्स' (Playful Candid Shots) असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. फोटोशूटचा ताण घालवून नैसर्गिक हसू मिळवण्यासाठी या पोझेस सर्वोत्तम ठरतात. ही पोझ रोमँटिक असूनही त्यात एक प्रकारचा निरागसपणा आणि खेळकरपणा असतो.
5 / 15
लग्नसोहळ्यातील हा 'जस्ट मॅरीड' (Just Married Celebration Shot) सर्वात उत्साहपूर्ण आणि आनंदाचा क्षण असतो. यात नवीन जोडप्याचा लग्नानंतरचा पहिला उत्स्फूर्त आणि आनंदी भाव कॅप्चर केला जातो. नवरदेव आणि नवरी एकमेकांकडे बघून खळखळून हसणे किंवा आनंदाने ओरडणे, नवरदेवाने नवरीला आपल्या हातात उचलून घेणे आणि दोघांचे चेहरे आनंदाने भरून येणे, जोडपे कॅमेऱ्याकडे पाठ करून उभे आहे आणि त्यांनी आनंदाने हात वर करून 'जस्ट मॅरीड' असा बोर्ड किंवा फलक दाखवला आहे. ही एक अतिशय क्लासिक आणि रोमँटिक पोझ आहे.
6 / 15
लग्नाच्या अल्बममध्ये ग्लॅमर आणि हाय-फॅशनचा टच देण्यासाठी 'एडिटोरियल पोझ' (Editorial Shot) अत्यंत लोकप्रिय ठरत आहेत. हे फोटो एखाद्या फॅशन मॅगझिनच्या कव्हरसारखे दिसतात, ज्यात जोडप्याचा आत्मविश्वास आणि स्टाईल प्रामुख्याने दिसून येते. या पोझ 'पॉवर कपल' वाइब देते. रिसेप्शनच्या आउटफिटमध्ये या पोझेस अधिकच अप्रतिम दिसतात.
7 / 15
लग्नाच्या अल्बममध्ये दोन व्यक्तींमधील जवळीक आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी 'रोमँटिक क्लोजअप शॉट' (Romantic Closeup Shot) अगदी अप्रतिम दिसतात. या शॉट्समध्ये बॅकग्राऊंडपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि भावनांना अधिक महत्त्व दिले जाते.
8 / 15
फोटोग्राफीच्या भाषेत 'गोल्डन हवर' (The Golden Hour) म्हणजे निसर्गाचा सर्वात सुंदर आणि जादुई प्रकाश. सूर्योदयानंतरचा किंवा सूर्यास्तापूर्वीचा सूर्य क्षितिजावर असतो आणि सगळीकडे सोनेरी छटा पसरलेली असते. हा प्रकाश रोमँटिक फोटोशूटसाठी 'परफेक्ट' मानला जातो. सोनेरी प्रकाशामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो येतो, ज्यामुळे फोटोमध्ये कमालीची सुंदरता दिसून येते.
9 / 15
लग्नाच्या फोटोशूटमध्ये एक प्रकारची 'राजेशाही' आणि 'फिल्मी' स्टाईल आणायची असेल, तर 'द ट्वर्ल्स पोझ' (The Twirl Shot) ला पर्याय नाही. नवरीच्या लेहेंग्याचा किंवा साडीचा घेर जेव्हा हवेत झुलतो, तेव्हा तो क्षण अतिशय देखणा आणि उत्साही दिसतो. नवरदेवाने नवरीचा एक हात उंचावून पकडणे आणि नवरीने संथ गतीने स्वतःभोवती गोल फिरणे. ही सर्वात लोकप्रिय पोझ आहे. यात नवरीचा आनंद आणि तिच्या पोशाखाचा पूर्ण घेर कॅमेऱ्यात खूप सुंदर दिसतो.
10 / 15
दोघांनी आपले कपाळ एकमेकांना टेकवणे आणि डोळे बंद करणे. ही एक अतिशय 'क्रिएटिव्ह' आणि आधुनिक पोझ आहे, जी तुमच्या लग्नाच्या अल्बममध्ये वेगळेपण जपते. यात फोटोंना एक सॉफ्ट आणि रोमँटिक फिल येतो.
11 / 15
नवरदेवाने नवरीला मागून मिठी मारणे किंवा नवरीने नवरदेवाच्या खांद्यावर डोके ठेवणे. ही पोझ अतिशय रोमँटिक आणि अत्यंत जवळची वाटते. यामध्ये जोडप्याने कॅमेऱ्याकडे पाहण्यापेक्षा एकमेकांकडे पाहून हसणे अधिक उठून दिसते.
12 / 15
एकमेकांचा हात हातात धरून चालणे. लग्नाच्या मंडपात किंवा गार्डनमध्ये एकमेकांकडे बघत चालतानाचे फोटो खूप 'रॉयल' वाटतात. चालताना एकमेकांशी काहीतरी गप्पा मारत राहा, जेणेकरून फोटोमध्ये नैसर्गिक हावभाव येतील.
13 / 15
लग्नाच्या विधींमधील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे 'वरमाला' (Varmala). जेव्हा नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या गळ्यात हार घालतात, तेव्हा त्या क्षणात उत्साह, प्रेम आणि एक प्रकारचा वेगळाच आनंद असतो. हा लग्नातील सर्वात मज्जेदार आणि 'प्लेफुल' क्षण असतो. यात दोघांच्या चेहऱ्यावरील हसू आणि चढाओढ अतिशय नैसर्गिक दिसते.
14 / 15
लग्नाच्या फोटोशूटमध्ये सर्वात नॅचरल आणि भावनिक वाटणारी पोझ म्हणजे कोझी हग. या पोझमध्ये जोडपं एकमेकांना हलक्या मिठीत घेतं, ज्यामुळे त्यांच्या नात्यातील जवळीक आणि प्रेम भावना सुंदरपणे कॅमेऱ्यात टिपली जाते. नवरा-नवरी एकमेकांकडे हसत पाहू शकतात किंवा डोळे बंद करून शांत क्षण अनुभवताना दिलेली पोझ फोटोला अधिक रोमँटिक आणि सॉफ्ट लूक देते.
15 / 15
लग्नसोहळ्यातील फोटोग्राफीमध्ये 'एकमेकांकडे पाहणे' (Looking At Each Other) ही सर्वात साधी पण अत्यंत भावूक पोझ मानली जाते. 'शब्दांशिवाय संवाद' साधणारी ही पोझ तुमच्यातील 'केमिस्ट्री' आणि प्रेम अधोरेखित करते. जेव्हा तुम्ही कॅमेऱ्याकडे न पाहता एकमेकांकडे पाहता, तेव्हा फोटोमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा येतो.
टॅग्स : सोशल व्हायरलशुभविवाह