Join us

घरभर काळ्या मुंग्याचा नुसता धुमाकूळ ? स्वयंपाक घरातील ५ पदार्थ असरदार - मुंग्या होतील चुटकीसरशी गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2025 16:00 IST

1 / 7
घरभर काळ्या मुंग्या फिरताना दिसल्या की, घरकामात त्रास तर होतो, पण सोबतच (how to get rid of black ants naturally) आपली देखील फार चिडचिड होते. घरात अन्नकण किंवा गोड पदार्थ (tips to remove ants from home) कुठेही ठेवले, की लगेच काळ्या मुंग्यांची रांग लागते. घरातील या मुंग्याचा वावर आपल्यासाठी फारच त्रासदायक ठरतो, तर कधी या मुंग्या चावा घेऊन आपल्याला अगदीच भंडावून सोडतात. स्वयंपाकघर, जेवणाची जागा किंवा अगदी बेडरूमपर्यंत या मुंग्यांचा उपद्रव सुरू असतो आणि नेमके काय करावे, हे समजत नाही.
2 / 7
बाजारातील केमिकलयुक्त स्प्रे, औषध, गोळ्या वापरल्याने तात्पुरता (home remedies for black ants) परिणाम दिसतो. परंतु त्यांचा वास आणि परिणाम जास्त काळ टिकत नाही. अशावेळी घरात उपलब्ध नैसर्गिक पदार्थांचा वापर करून मुंग्यांना दूर ठेवता येते आणि घरही स्वच्छ राहते.
3 / 7
जर घरात काळ्या मुंग्यांची रांग लागली असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. थोडीशी साखर आणि बोरिक पावडर वापरून आपण मुंग्यांना येण्यापासून रोखू शकतो. थोड्याशा साखरेमध्ये बोरिक पावडर व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण मुंग्यांचा वावर असणाऱ्या ठिकाणी ठेवून द्या. साखरेच्या वासाने मुंग्या आकर्षित होतात आणि आणि बोरिक पावडरच्या तीव्र गंधामुळे जागीच मरतात. या छोट्याशा उपायाने लगेच फरक पडेल.
4 / 7
घरात मुंग्यांचा वावर सतत वाढत असेल, तर आपण एक सोपा उपाय करून पाहू शकता. मुंग्या ज्या ठिकाणांहून येतात त्या ठिकाणी कापूर आणि लवंग ठेवा. कापूर, लवंगांचा तीव्र आणि उग्र गंध असल्यामुळे मुंग्या त्या ठिकाणाच्या जवळ येत नाहीत. अशा प्रकारे, तुम्ही जास्त खर्च न करता तुमच्या घराला मुंग्यांपासून सुरक्षित ठेवू शकता.
5 / 7
जर तुम्हाला मुंग्यांपासून लवकरात लवकर सुटका हवी असेल, तर लिंबाचा रस हा देखील सर्वात सोप्या उपायांपैकी एक आहे. लिंबाचा रस त्या ठिकाणी शिंपडा, जिथे मुंग्यांचा जास्त वावर आहे. लिंबाचा उग्र वास आणि त्याचा आम्लयुक्त गुणधर्म त्यांना त्या ठिकाणाहून पळवून लावतो. या उपायामुळे मुंग्यांच्या त्रासापासून मुक्तता मिळते.
6 / 7
दालचिनी पावडर देखील मुंग्यांना पळवून लावण्यासाठी अत्यंत असरदार उपाय आहे. जर घरात मुंग्यां फार मोठ्या प्रमाणात येऊन त्रास देत असतील तर त्या ठिकाणी दालचिनीची पावडर शिंपडा. दालचिनीचा तीव्र सुगंध मुंग्यांना पळवून लावतो.
7 / 7
घरात ज्या ठिकाणी मुंग्या असतील त्या ठिकाणी थोडे मीठ शिंपडा. यामुळे मुंग्या तिथे येणार नाहीत किंवा मरून जातील. हा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे, ज्यामुळे घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके राहील.
टॅग्स : सोशल व्हायरलहोम रेमेडीस्वच्छता टिप्स