कोण आहे अवनीत कौर जिची विराट कोहलीच्या 'लाइक'मुळे सोशल मीडियावर रंगली चर्चा?
Updated:May 8, 2025 17:04 IST2025-05-08T16:03:33+5:302025-05-08T17:04:20+5:30
Avneet Kaur-Virat Kohli : विराट कोहलीनं फोटो लाइक केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेली अवनीत कौर कोण?

Avneet Kaur-Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू म्हणजे किंग कोहली म्हणजेच विराट कोहलीचे फॅन जगभरात आहेत. त्याची एक झलक बघण्यासाठी हे फॅन्स वाट्टेल ते करतात. अशात जर त्यानं कुणाशी संवाद साधला किंवा सोशल मीडियावर कुणाचा फोटो लाइक केला तर ही फार मोठी बाब आहे.
साधारणपणे कोहली असं करताना कमी दिसतो. पण अलिकडेच चुकून म्हणा की अजून काही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौरचा एक फोटो लाइक झाला होता.
याबाबत त्यानं त्याच्या इन्स्टा स्टोरीवरून स्पष्टीकरणही दिलं होतं. अर्थात त्यानं चुकून लाइक केलेल्या फोटोतील चर्चेत आलेली अवनीत कौर कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तेच जाणून घेऊ.
अवनीत कौरचा जन्म 13 ऑक्टोबर 2001 ला पंजाबच्या जालंधर शहरात झाला होता. सध्या तिचं वय 23 आहे. ती टीव्ही मालिकांमध्ये काम करते आहे आणि अलिकडेच झालेल्या कान फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये ती दिसली होती.
अवनीत कौरनं तिच्या करिअरची सुरूवात केवळ नऊ वर्षाची असताना केली होती. त्यावेळी ती 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स' शोमध्ये दिसली होती.
या शो शिवाय अवनीत 'सावित्री एक प्रेम कहाणी', 'एक मुट्ठी आसमान', 'अलादीन - नाम तो सुना होगा' या मालिकांमध्येही दिसली होती.
छोट्या पडद्यावर म्हणजे मालिकांमधून फेमस असण्यासोबतच अवनीत सोशल मीडियावरही खूप फेमस आहे. इन्स्टावर तिचे 31.7 मिलिअन फॉलोअर्स आहेत. म्हणजे ती भारतात सगळ्यात जास्त फॉलो केल्या जाणाऱ्या स्टारपैकी एक आहे.
जान्हवी कपूर, तमन्ना भाटिया, अनन्या पांडे आणि पूजा हेगडेपेक्षा तिचे जास्त फॉलोअर्स आहेत. आधी तिचं नाव शुभमन गिलसोबतही जोडलं गेलं होतं.
इतकंच नाही तर अवनीतने टॉम क्रुझचा सिनेमा 'मिशन इम्पॉसिबल 8' मध्येही काम केलं आहे. हा सिनेमा 23 मे 2025 ला भारतात रिलीज होणार आहे.