1 / 11 'वाळा' ही एक सुगंधी औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या मुळ्यांमध्ये (Top 7 Healing Benefits of Vetiver) नैसर्गिक गंध आणि थंडावा देणारे गुणधर्म असतात. वाळा (What is the magical use of vetiver) प्रामुख्याने सुकलेल्या गवतासारखी दिसणारी वनस्पती आहे, जी जमिनीत खोलवर रुजते आणि तिच्या मुळ्यांमध्ये विशेष औषधी गुणधर्म असतात. 2 / 11प्रामुख्याने उन्हाळ्यात वाळ्याचा (vetiver) वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी, त्वचारोगांवर, घाम येऊ नये म्हणून तसेच आरामदायक झोपेसाठी केला जातो. 3 / 11उन्हाळ्यात उष्णतेमुळे आणि रणरणत्या उन्हामुळे शरीराचं तापमान वाढलेलं असतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अशावेळी वाळा नैसर्गिक थंडावा आणि आराम देणारा घटक म्हणून वापरला जातो.4 / 11उन्हाळ्यात आपले आरोग्य जपण्यासाठी वाळ्याचा कोणकोणत्या पद्धतीने वापर करु शकतो, ते पाहूयात. 5 / 11वाळ्याच्या मुळ्या पाण्यात भिजवून त्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते, त्वचा थंड राहते, आणि मूत्रपिंडांची कार्यक्षमता वाढते. याचबरोबर, उन्हाळ्यातील घामोळं, उष्माघाताचे प्रमाण कमी करुन आपल्याला ताजेतवाने करते. 6 / 11 उन्हाळ्यात घर नैसर्गिकरित्या थंडगार ठेवण्यासाठी ए.सी पेक्षा वाळा केव्हाही उत्तमच आहे. उन्हाळ्यात वाळ्याचे पडदे खिडक्यांवर लावले जातात. वाळ्याच्या पडद्यावर पाणी शिंपडल्यावर घरात शीतल, सुगंधी हवा खेळती राहते. त्यामुळे घर नैसर्गिकरीत्या थंड राहतं. यासोबतच, आपण वाळ्याचे पंखे देखील वापरु शकतो. 7 / 11वाळ्याचे उटणं, बाथ पावडर किंवा फेसवॉश, तसेच फेसपॅकच्या स्वरूपात वापरल्यास त्वचेवरील उष्णतेचा परिणाम कमी होतो. वाळ्याच्या मुळ्या घामोळं, पुरळ व त्वचेची जळजळ यावरही फायदेशीर ठरतात. 8 / 11 वाळ्याच्या मुळ्या भरलेले उशी झोपताना डोक्याजवळ ठेवली तर तिच्या सुगंधामुळे मनःशांती मिळते आणि गाढ झोप लागते. उन्हाळ्यातील बेचैनी किंवा उकाड्याने झोप येत नसेल तर हा उपाय उन्हाळ्यात नक्की करुन पाहा. 9 / 11वाळ्याचा अर्क डिओड्रंट, साबण, फेसवॉश, फेसमास्क यात प्रामुख्याने वापरला जातो. याचा गंध शरीराला येणारी घामाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करतो. 10 / 11वाळा पाण्यांत भिजवून मग त्याचे पाणी गाळून त्यात लिंबू, थोडी साखर, किंवा गुलकंद घालून आपण सरबत तयार करु शकता. उन्हाळ्यात हे सरबत प्यायल्याने शरीराचे उष्णतेपासून संरक्षण केले जाते. यासोबतच ताजेतवाने वाटते आणि पोटाला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात उकाड्याने येणारा थकवा, अशक्तपणा यांसारख्या समस्या कमी होतात. 11 / 11उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी आंघोळीनंतर वाळ्याचा अर्क असलेले तेल लावा. विकतचे महागडे आर्टिफिशियल डिओड्रंट, सेंट खरेदी करण्यापेक्षा हा नैसर्गिक उपाय कधीही उत्तमच.