1 / 8बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. ती अनेकदा काही टिप्स किंवा सजावटीनिमित्त गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते. नुकतीचे तिने आपल्या चाहत्यांना फुलांच्या सजावटीची सुंदर कल्पना शेअर केली. (Twinkle Khanna’s Diwali flower pot decoration ideas for home)2 / 8दिवाळीत आपल्या घरी अनेक पाहुणे येतात. अशावेळी घर सुंदर, फ्रेश ठेवायचे असेल कर हा फ्लॉवर पॉट घरी कसा बनवायचा हे पाहूया. यासाठी जास्त खर्च किंवा जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. पाहूया काही सोप्या स्टेप्स.(Flower pot decoration ideas for Diwali) 3 / 8सगळ्यात आधी आपल्याला १५ ते १६ इंच लांबीच्या तीन बांबूच्या काड्या घ्याव्या लागतील. या काड्या एकत्र जोडून तंबू किंवा त्रिकोणी आकार तयार करा. आपण हे दोरीने बांधू शकतो किंवा तार वापरु शकतो. काड्या अशा प्रकारे बांधा, ज्या उभ्या राहतील. 4 / 8आत एक हिरव्या रंगाचा स्पंज बॉल घ्या. ज्यामुळे आपण त्यात ठेवलेली फुले उठून दिसतील. हा बॉल बांबूच्या त्रिकोणावर व्यवस्थित बसवा. ज्यामुळे फुले व्यवस्थित बसू शकतात. 5 / 8आपल्या आवडत्या रंगाची फ्रेश किंवा कृत्रिम फुले घ्या. देठांना २ ते ३ इंच वायरच्या तुकड्यात जोडा. देठांना वायरमध्ये घट्ट चिकटवा, ज्यामुळे स्पंज बॉलला व्यवस्थित जोडता येईल. 6 / 8तयार केलेली फुले स्पंज बॉलमध्ये एक-एक करुन घुसवा. फुले अशा प्रकारे ठेवा, ज्यामुळे त्याच्या आतील जागा रिकामी दिसणार नाही. जास्त आकर्षित बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या रंगाची आणि आकाराची फुले मिळतील. मध्यभागी मोठी फुले आणि कडांवर लहान फुले देखील ठेवू शकतो. 7 / 8स्पंज बॉल फुलांनी झाकला गेल्यावर त्यात कोणतेच अंतर उरले नाही ना हे तपासा. डिझाइन पूर्ण करण्यासाठी लहान फुले किंवा पाने घाला. 8 / 8हे फ्लॉवर पॉट आपण डायनिंग, मुलांच्या रुममध्ये किंवा दिवाळीत डेकोरेशन म्हणून ठेवू शकतो. किंवा कोणत्याही खास प्रसंगी फ्लॉवर स्टँड सजवू शकता. ज्यामुळे आपल्या घराचा संपूर्ण लूक बदलेल.