Tulsi Vivah 2024 : तुळशीच्या लग्नासाठी काढा १० आकर्षक रांगोळ्या; समारंभाची वाढेल शोभा
Updated:November 6, 2024 15:18 IST2024-11-05T14:33:57+5:302024-11-06T15:18:27+5:30
Tulsi Vivah 2024 : तुळशीच्या लग्नासाठी तुम्ही एकापेक्षा एक रांगोळी डिजाईन्स ट्राय करू शकता.

तुळशीच्या लग्नाच्या (Tulsi Vivah) दिवशी दारापुढे रांगोळ्या काढण्याला खास महत्व असते. तुळशीच्या स्वागतासाठी दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. (Easy Rangoli Designs Easy Tricky Rangoli)
तुळशीच्या लग्नासाठी तुम्ही एकापेक्षा एक रांगोळी डिजाईन्स ट्राय करू शकता. काही सोप्या ५ मिनिटांत काढता येतील अशा डिजाईन्स पाहूया.
तुळशीच्या रांगोळ्या काढण्यासाठी तुम्ही बांगड्या, चमचे, ताट, वाट्या, दिवे, हेअरपिन्सची मदत घेऊ शकता.
रांगोळीत तुळस काढून तुम्ही त्यावर शुभ विवाह असा संदेश लिहू शकता.
तुलशीच्या लग्नाची रांगोळी तुम्हाला साधी, आकर्षक, थोडी ट्रिकी अशी वेगवेगळ्या प्रकारे काढता येईल.
फुलं आणि तुळशीच्या मंजिरी सजावटीसाठी उत्तम दिसतील.
तुळशीची रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला हिरवा, पोपटी, चॉकलेटी, पिवला, लाल हे रंग लागतील ज्यामुळे रांगोळी उठून दिसेल.
या रांगोळीत तुम्ही बाशिंग, बांगड्या, मंगळसुत्र असे साहित्य सजावटीसाठी ठेवू शकता.
लग्नासााठी लागणारे इतर साहित्य, वााद्य, नारळाचे झाडसुद्धा रांगोळीत दाखवता येईल.
सनई आणि तबल्यावर रांगोळीचे चित्र काढले तरी ही रांगोळी उठून दिसेल आणि रांगोळीला शोभा येईल.
(Image Credit - Social Media)