Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मूड कोणताही असो, शॉपिंग तर पाहिजेच! कोणत्या देशातील महिला करतात जास्त खरेदी? पाहा भारताचा नंबर कितवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2026 19:05 IST

1 / 8
'खरेदी' किंवा 'शॉपिंग' हा शब्द कानावर पडला तरी अनेक महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. मग ते लेटेस्ट फॅशनचे कपडे असोत, दागिने असोत किंवा घरासाठी लागणाऱ्या वस्तू; खरेदी करणे हा महिलांसाठी केवळ गरजेचा भाग नसून तो एक 'स्ट्रेस बस्टर' आणि आनंदाचा क्षण असतो. अनेकदा गमतीने म्हटले जाते की, महिलांना शॉपिंगपासून दूर ठेवणे अशक्य आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? जगाच्या नकाशावर असे काही देश आहेत, जिथल्या महिला खरेदीच्या बाबतीत साऱ्या जगाला मागे टाकतात(top countries where women spend most on shopping).
2 / 8
नुकत्याच समोर आलेल्या काही जागतिक रिसर्च आणि ग्राहक सर्वेक्षणांनुसार खरेदी करण्याच्या सवयींमध्ये काही देशांतील महिलांचे वर्चस्व दिसून आले आहे. ऑनलाईन असो वा ऑफलाईन, या देशांमधील महिलांच्या शॉपिंग बॅग्ज कधीच रिकाम्या नसतात.
3 / 8
१. जगातील विविध देशांपैकी युनायटेड स्टेट्स (USA), लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड आणि नॉर्वे या तीन देशांमधील महिला सर्वाधिक 'शॉपिंग' करतात.
4 / 8
२. या देशांमधील महिलांना केवळ खरेदीच नाही, तर 'लक्झरी' आणि अतिशय महागड्या वस्तू खरेदी करायला जास्त आवडते. आकडेवारीनुसार, या देशांमध्ये फॅशनवर प्रति व्यक्ती सर्वाधिक खर्च केला जातो. साधारणपणे दरवर्षी १००० ते १७०० युरो (अंदाजे ९०,००० ते १.५ लाख रुपये) केवळ कपड्यांवरच खर्च होतात. इथल्या महिला महागडे ब्रँड्स, उच्च दर्जाचे कपडे (Quality Clothing) आणि स्टायलिश ॲक्सेसरीजवर पैसे खर्च करण्यात जगात सर्वात पुढे आहेत.
5 / 8
३. विविध जागतिक अहवाल (Reports) आणि सर्वेक्षणांनुसार, कपडे खरेदी करण्याच्या बाबतीत युनायटेड स्टेट्स (USA) मधील महिलांचे नाव सर्वात वर घेतले जाते. मात्र, काही आकडेवारीनुसार हाँगकाँगच्या महिलांनी या बाबतीत साऱ्या जगाला मागे टाकले आहे. हाँगकाँगमध्ये एका वर्षात एक महिला सरासरी ११७ ते ११९ नवीन कपडे खरेदी करते, जो एक जागतिक उच्चांक मानला जातो. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड हा देश येतो, जिथे महिला दरवर्षी सरासरी ९७ ते ९८ नवीन कपड्यांची खरेदी करतात.
6 / 8
४. आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन शॉपिंगने खरेदीची व्याख्याच बदलली आहे. यामध्ये चीनमधील (China) महिला जगात सर्वात पुढे आहेत. एका संशोधनानुसार, चीनमधील महिला आठवड्याला सरासरी ८ तासांहून अधिक वेळ केवळ ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर वस्तू शोधण्यात (Browsing) घालवतात. या यादीत दक्षिण कोरिया आणि तैवान या देशांतील महिलांचाही समावेश आहे, ज्यांना ऑनलाईन शॉपिंग करण्यास प्रचंड आवडते. अमेरिका (USA) या बाबतीत मागे नाही.
7 / 8
५. अमेरिकन महिला वर्षाला सरासरी ७ वेळा ऑनलाइन कपड्यांची खरेदी करतात. विशेष म्हणजे, संपूर्ण कपड्यांच्या बाजारपेठेत अमेरिका आजही जगात नंबर १ वर आहे. दुसरीकडे, लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड आणि नॉर्वे या देशांतील महिला कपड्यांच्या संख्येपेक्षा त्यांच्या क्वालिटी (Quality) आणि लक्झरी ब्रँड्सवर (Luxury Brands) अधिक जास्त पैसे खर्च करतात. या देशांमधील महिला प्रति व्यक्ती कपड्यांवर सर्वाधिक पैसे खर्च करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
8 / 8
६. जगभरातील आकडेवारी पाहता, अमेरिका आणि चीननंतर भारत हे जगातील तिसरे सर्वात मोठे कपड्यांचे मार्केट आहे. मात्र, जेव्हा आपण 'प्रति व्यक्ती' खरेदीचा विचार करतो, तेव्हा भारत अजूनही बराच मागे असल्याचे दिसून येते. एका संशोधनानुसार, भारतीय महिला वर्षाला सरासरी केवळ ५ नवीन कपडे खरेदी करतात. याउलट, अमेरिकेतील महिला वर्षाला सरासरी ५३ आणि चीनमधील महिला सरासरी ३० नवीन कपड्यांची खरेदी करतात. भारतीय बाजारपेठ मोठी असली, तरी इथल्या महिला अजूनही गरजेनुसार आणि सण-उत्सवांनाच अधिक खरेदी करण्यावर भर देतात.
टॅग्स : सोशल व्हायरलमहिलाखरेदी