फ्रिजमध्ये नेहमीच खूप बर्फ साचतो? फ्रिज वापरताना लक्षात ठेवा सोप्या ट्रिक्स- बर्फ साचणार नाही
Updated:April 26, 2025 09:25 IST2025-04-26T09:21:58+5:302025-04-26T09:25:01+5:30

ज्यांच्याकडे सिंगल डोअर फ्रिज असतं, त्यांच्याकडे बऱ्याचदा फ्रिजरमध्ये जास्त बर्फ जमा होतो. असं होऊ नये म्हणून या काही गोष्टी तुम्ही करून पाहू शकता..
फ्रिजचं तापमान तुम्ही खूप जास्त थंड ठेवलं आहे का ते एकदा सेटींगमध्ये पाहा.. हिवाळा किंवा पावसाळ्याच्या दिवसांत मध्यम किंवा कमी तापमान ठेवावे.
फ्रिजचं रबर खराब झालं असेल तर त्यामुळे फ्रिज व्यवस्थित बंद होत नाही. यामुळेही फ्रिजरमध्ये बर्फ साचून राहण्याचे प्रमाण वाढते.
फ्रिजमध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वस्तू कोंबून ठेवत असाल तर त्यामुळेही आतल्या भागातला एअर फ्लो बंद होऊन फ्रिजमध्ये बर्फ साचून राहण्याचे प्रमाण वाढू शकते.
आठवड्यातून किंवा १५ दिवसांतून एकदा फ्रिजचा डिफ्रोस्ट मोड सुरू करा. यामुळेही बर्फ साचण्याचे प्रमाण खूप कमी होईल.