कामाची गोष्ट! सजावटीच्या नादात तुम्हीही करत नाही ना 'या' चुका? फ्रिजचं होईल मोठं नुकसान

Updated:February 2, 2026 14:27 IST2026-02-02T14:20:21+5:302026-02-02T14:27:15+5:30

फ्रिजच्या वर कोणत्या गोष्टी ठेवू नयेत, हे जाणून घेऊया...

कामाची गोष्ट! सजावटीच्या नादात तुम्हीही करत नाही ना 'या' चुका? फ्रिजचं होईल मोठं नुकसान

आजच्या काळात फ्रिज ही प्रत्येक घराची गरज बनली आहे. उन्हाळ्यात पाणी थंड करण्यापासून ते फळे, भाज्या आणि अन्न साठवण्यापर्यंत फ्रिज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

कामाची गोष्ट! सजावटीच्या नादात तुम्हीही करत नाही ना 'या' चुका? फ्रिजचं होईल मोठं नुकसान

पूर्वी जी चैनीची वस्तू मानली जात होती, ती आता प्रत्येक स्वयंपाकघरात दिसते. मात्र, अनेकदा छोट्या छोट्या चुकांमुळे हा फ्रिज लवकर खराब होऊ लागतो, ज्यामुळे दुरुस्तीचा मोठा खर्च सोसावा लागतो.

कामाची गोष्ट! सजावटीच्या नादात तुम्हीही करत नाही ना 'या' चुका? फ्रिजचं होईल मोठं नुकसान

अनेकदा लोक जागा वाचवण्यासाठी किंवा सजावटीच्या नादात फ्रिजच्या वर विविध वस्तू ठेवतात. दिसायला हे सामान्य वाटत असले, तरी ही सवय फ्रिजची कार्यक्षमता आणि आयुष्य दोन्ही कमी करू शकते. म्हणूनच, फ्रिजच्या वर कोणत्या गोष्टी ठेवू नयेत, हे जाणून घेऊया...

कामाची गोष्ट! सजावटीच्या नादात तुम्हीही करत नाही ना 'या' चुका? फ्रिजचं होईल मोठं नुकसान

घराच्या सजावटीसाठी लोक अनेकदा फ्रिजच्या वर कुंड्या किंवा प्लांटर्स ठेवतात. परंतु कुंड्यांमुळे फ्रिजवर अतिरिक्त दाब पडतो, ज्यामुळे तो खराब होण्याचा धोका वाढतो. याशिवायफ्रिजमधून बाहेर पडणाऱ्या 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड'चा परिणाम काही झाडांच्या वाढीवरही होऊ शकतो.

कामाची गोष्ट! सजावटीच्या नादात तुम्हीही करत नाही ना 'या' चुका? फ्रिजचं होईल मोठं नुकसान

औषधं वेळेवर आठवणीने घेता यावीत म्हणून अनेकजण ती फ्रिजच्या वर ठेवतात. पण असं करणं चुकीचं आहे. फ्रिज आतून जरी थंड असला तरी बाहेरून तो अनेकदा गरम होतो. या उष्णतेमुळे औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि त्यांची गुणवत्ता खराब होऊ शकते.

कामाची गोष्ट! सजावटीच्या नादात तुम्हीही करत नाही ना 'या' चुका? फ्रिजचं होईल मोठं नुकसान

घराची शोभा वाढवण्यासाठी फ्रिजवर फिश एक्वेरियम ठेवणं नुकसानदायक ठरू शकतं. फ्रिजमधून बाहेर पडणारी उष्णता आणि व्हायब्रेशनचा माशांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अनेक प्रकरणांमध्ये असं दिसून आलं आहे की फ्रिजवर ठेवलेल्या एक्वेरियममधील मासे लवकर मरतात.

कामाची गोष्ट! सजावटीच्या नादात तुम्हीही करत नाही ना 'या' चुका? फ्रिजचं होईल मोठं नुकसान

अनेकजण आपल्या ट्रॉफी आणि पुरस्कार फ्रिजच्या वर सजवून ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानलं जाते. तसेच, धातूपासून बनवलेल्या जड वस्तू फ्रिजवर ठेवल्यामुळे त्याच्या अंतर्गत भागांचे नुकसान होऊ शकते.

कामाची गोष्ट! सजावटीच्या नादात तुम्हीही करत नाही ना 'या' चुका? फ्रिजचं होईल मोठं नुकसान

जागा वाचवण्यासाठी फ्रिजच्या वर टोस्टर, मायक्रोवेव, रेडिओ किंवा ओव्हन ठेवणे ही सामान्य बाब आहे. मात्र फ्रिजच्या कॉम्प्रेसरमधून निघणारे व्हायब्रेशन आणि उष्णता या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या अंतर्गत भागांना खराब करू शकतात, ज्यामुळे त्या लवकर निकामी होऊ शकतात.