इडली - डोशाचं पीठ जास्त आंबलं, फेकून देण्याआधी वाचा ८ फायदे! घराच्या स्वच्छतेसाठीही उपयोगी...
Updated:September 22, 2025 17:23 IST2025-09-22T17:10:11+5:302025-09-22T17:23:06+5:30
how to use spoiled dosa batter for cleaning : dosa batter cleaning tips : homemade cleaning hacks with dosa batter : spoiled dosa batter uses for household cleaning : इडली - डोशाचं बॅटर फक्त स्वयंपाकातच नव्हे तर घरातील विविध स्वच्छतेच्या कामांसाठीही उपयोगी पडू शकतं...

इडली - डोशाचे बॅटर काहीवेळा जास्त प्रमाणांत फुलून येतं आणि हे जास्तीचे बॅटर अनेकदा वापरायच्या आधीच आंबट होऊन जातं. अशावेळी या जास्तीच्या पिठाचे नेमके (how to use spoiled dosa batter for cleaning) करायचे काय असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. उरलेलं बॅटर फक्त स्वयंपाकातच नव्हे तर घरातील विविध स्वच्छतेच्या कामांसाठीही उपयोगी पडू शकतं.
इडली - डोशाचे शिल्लक राहिलेलं बॅटर फक्त खाण्यासाठीच नाही तर, घरातील ( homemade cleaning hacks with dosa batter) इतर स्वच्छतेच्या कामांसाठीही वापरू शकता. इडली - डोशाच्या बॅटरचा पुनर्वापर करून आपण घरातील स्वच्छतेची अनेक कामे कशी सहज सोपी करु शकतो ते पाहूयात.
१. किचनमधील स्टील सिंक साफ करण्यासाठी :-
जर स्वयंपाकघरातील स्टील सिंक घाण आणि डागांमुळे खूपच खराब झाले असेल तर, यासाठी आंबट झालेले इडली - डोसा बॅटर उपयोगी येऊ शकते. या बॅटरमधील आंबटपणा स्टीलच्या पृष्ठभागावर साचलेली घाण सहज काढायला मदत करतो. बॅटर सिंकवर चांगले लावा आणि स्क्रबरच्या मदतीने हलकेच घासून घ्या. सुमारे १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि पाण्याने धुवा. यामुळे किचनमधील स्टील सिंक पुन्हा पहिल्यासारखा नवीन असल्याप्रमाणे चमकू लागेल.
२. नळ स्वच्छ करण्यासाठी :-
खराब झालेल्या इडली - डोशाच्या बॅटरने फक्त सिंकच नाही, तर घरातील स्टीलचे नळही स्वच्छ करता येतात. अनेकदा नळांवर खारट पाण्याचे पांढरे डाग साचून राहतात. परंतु नळांवरील हे पांढरे डाग या बॅटरच्या मदतीने आपण सहज काढू शकतो. बॅटर नळांवर व्यवस्थित लावून थोडा वेळ तसेच ठेवा आणि नंतर पाण्याने धुऊन टाका. या उपायाने नळ नव्यासारखे चकाकू लागतील आणि तुम्हाला वेगळा क्लीनर विकत घेण्यासाठी पैसेही खर्च करावे लागणार नाहीत.
३. रोपांसाठी फायदेशीर :-
जेव्हा आपण इडली - डोशाच्या बॅटरने सिंक किंवा नळ स्वच्छ करता तेव्हा त्या पाण्याचा वापर घरातील रोपांसाठी करु शकतो. यासोबतच, आपण थोडे बॅटर घेऊन त्यात पाणी घालून ते पाणी कुंडीतील रोपांना घालावे. बॅटरमधील पोषक घटक झाडांच्या मातीसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे रोपांची वाढ दुप्पट वेगाने होण्यास मदत मिळते.
४. किचनमधील कुबट दुर्गंधी घालवण्यासाठी :-
अनेकदा स्वयंपाक केल्यानंतर स्वयंपाकघरात एक वेगळाच वास राहतो, जो त्रासदायक वाटतो. खराब झालेल्या बॅटरचा वापर करून आपण हा वासही कमी करू शकता. फक्त थोडे बॅटर स्वयंपाकघरातील कोपऱ्यांमध्ये लावा आणि काही वेळाने पाण्याने स्वच्छ करा. यामुळे केवळ स्वच्छताच होणार नाही, तर किचनमधील कुबट दुर्गंधीही कमी होईल.
५. गॅस स्टोव्ह साफ करण्यासाठी :-
गॅसच्या बर्नरवर किंवा स्टोव्हवर बॅटर लावून १५ मिनिटं ठेवा. नंतर ओल्या कापडाने पुसून काढा. चिकटलेले तेलकट डाग सहज निघून जातील.
६. टाइल्सची चमक वाढवण्यासाठी :-
बाथरुम टाइल्सवर बॅटर चोळून आपण खराब झालेले टाईल्स देखील स्वच्छ करु शकतो. टाइल्सवरील पिवळसर थर व डाग निघून जातात आणि टाईल्स नव्यासारखी चमकू लागते.
७. लोखंडी भांड्यांचा गंज काढण्यासाठी :-
लोखंडी कढई किंवा तवा यावर बॅटर लावून काही वेळ ठेवा. त्यानंतर स्क्रबरने स्वच्छ करा. लोखंडी भांड्यांवरील गंजाचा थर कमी होतो.
८. तांब्याच्या भांड्यांची स्वच्छता :-
इडली - डोशाच्या बॅटरमध्ये थोडं मीठ मिसळून तांब्याच्या भांड्यांवर लावून, नंतर धुवून घेतल्यास भांड्यांना पुन्हा नैसर्गिक चमक येते.