झणझणीत मराठी मिसळ ठरली जगात भारी! नाश्त्याचा बेस्ट पदार्थ म्हणून जगात मिळवला अव्वल नंबर

Updated:June 10, 2025 17:13 IST2025-06-10T16:51:23+5:302025-06-10T17:13:42+5:30

Spicy Marathi misal has become a global hit! : भारतीय पदार्थांना मिळाली जगातील भारी पदार्थांच्या यादीत जागा. आपली मिसळही आहे यादीचा भाग.

झणझणीत मराठी मिसळ ठरली जगात भारी! नाश्त्याचा बेस्ट पदार्थ म्हणून जगात मिळवला अव्वल नंबर

नाशिकची मिसळ जगात भारी की कोल्हापूरची की पुण्याची की नगरची की तुमच्या गल्लीतली? भांडत बसू नका, आपली मिसळच आता एकूण जगात भारी ठरलेली आहे.

झणझणीत मराठी मिसळ ठरली जगात भारी! नाश्त्याचा बेस्ट पदार्थ म्हणून जगात मिळवला अव्वल नंबर

जगातले सर्वात भारी नाश्ते कोणते याची एक यादीच नुकतीच प्रसिध्द झाली आणि तुम्हाला खोटं वाटेल पण भारतातला सर्वात भारी नाश्ता म्हणून मिसळनं बाजी मारली.

झणझणीत मराठी मिसळ ठरली जगात भारी! नाश्त्याचा बेस्ट पदार्थ म्हणून जगात मिळवला अव्वल नंबर

भारतात घरोघर नी हॉटेलात काय कमी पदार्थ आहेत का नाश्त्याचे? पण ही यादी म्हणते की मिसळ हा भारतातला भारी नाश्ता आहे. त्यामागोमाग भारतीय पदार्थांत छोले भटूरे आणि पराठ्यांचा नंबर लागला आहे.

झणझणीत मराठी मिसळ ठरली जगात भारी! नाश्त्याचा बेस्ट पदार्थ म्हणून जगात मिळवला अव्वल नंबर

जगभरातील खाद्यपदार्थांत लोकप्रिय कोणते, पौष्टिक कोणते, भारी कोणते याची यादी 'टेस्टअटलास'ने नुकतीच जाहीर केली. जगभरातील ५० उत्तम नाश्त्याच्या पदार्थांची ही यादी. त्यात भारतातील मिसळ, छोले भटूरे नी पराठे यांनी स्थान मिळवले.

झणझणीत मराठी मिसळ ठरली जगात भारी! नाश्त्याचा बेस्ट पदार्थ म्हणून जगात मिळवला अव्वल नंबर

नाश्त्याच्या जगभरातील सर्वोत्तम पदार्थाच्या यादीत मराठी मिसळ १७ व्या क्रमांकावर आहे. प्रोटीन आणि पॉवरफूल टेस्ट असा हा झणझणीत मामला न सरसच ठरला.

झणझणीत मराठी मिसळ ठरली जगात भारी! नाश्त्याचा बेस्ट पदार्थ म्हणून जगात मिळवला अव्वल नंबर

पंजाबचा खास नाश्ता म्हणजे पराठा. त्याचा या यादीत २२वा क्रमांक आहे. पराठे खाऊन नाश्ता म्हणजे फक्त कार्ब असं म्हणणाऱ्यांनी जरा हे वाचलेलंच बरं.

झणझणीत मराठी मिसळ ठरली जगात भारी! नाश्त्याचा बेस्ट पदार्थ म्हणून जगात मिळवला अव्वल नंबर

छोले भटुरे हा पदार्थ भारतात खास म्हणजे दिल्लीत फार लोकप्रिय आहे. टेस्टअटलासच्या यादीमध्ये छोले भटुरे ३१ व्या क्रमांकावर आहेत. कोहलीला आवडतात तर सगळ्यांना आवडणारच, नाही का?