स्वस्तात सुंदर घर सजवण्यासाठी खास आयडिया - पाहा घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू , नक्की आणा
Updated:September 15, 2025 11:34 IST2025-09-15T11:26:18+5:302025-09-15T11:34:47+5:30
Special ideas to decorate your home - Check out the items that will enhance the beauty of your home : घर सजवण्यासाठी वापरा या वस्तू. स्वस्त आणि सुंदर.

घर सुंदर ठेवणे फार महत्त्वाचे असते. गलिच्छ अस्वच्छ घर प्रसन्न वाटत नाही. घर जर प्रसन्न नसेल तर घरात शांतता आणि आनंद जाणवत नाही. त्यामुळे घर छान असायला हवे.
घर सजवायचे म्हणजे भरपूर खर्च आणि काम असे जर तुम्हालाही वाटत असेल तर तसे मुळीच नाही. कारण काही साध्या सोप्या आणि स्वस्त वस्तूंचा वापर करुनही घर सुशोभित करता येते. घरात ठेवण्यासाठी छान वस्तू पाहा कोणत्या असतात.
घराच्या एखाद्या कोपऱ्यात छान अशी फुलदाणी ठेवणे नक्कीच सुंदर दिसते. साधी काचेची किंवा लाकडाची मस्त अशी फुलदाणी दारापाशीही सुंदर दिसते.
स्वयंपाकघराजवळ तसेच कपाटाच्या बाजूला छान अशी मनीप्लांटची वेल ठेवता येते. हे रोप जास्त सांभाळावं लागत नाही. त्यामुळे घरी लावायला सोपे आहे. शिवाय कोणत्याही वातावरणात छान फुलते.
आजकाल वॉल आर्ट फार प्रसिद्ध प्रकार आहे. भिंत फारच सुंदर दिसते. वॉल आर्ट करण्यासाठी स्टिकर्स मिळतात तसेच आर्टिस्ट घरी येऊनही करुन देतात.
विणलेल्या टोपल्या, कंदील, लॅम्प अशा वस्तूही फार सुंदर दिसतात. स्वस्त मिळतात तसेच त्यांचा इतरही वापर करता येतो. फक्त शोभेसाठीच वापरता येतात असे काही नाही.
एखादी छान देवाची किंवा कोणतीही मुर्ती घरात ठेवणे नक्कीच सुंदर दिसते. घराच्या एखाद्या कोपर्यात किंवा शोकेसमध्ये मस्त मुर्ती ठेवा.
वर्षानुवर्षे केले जाणारे डेकोरेशन म्हणजे फोटोफ्रेम. घरच्यांचे फोटो तसेच एखाद्या मोठ्या कलाकाराचे चित्र भिंतीवर लावणे फारच सुंदर वाटते. फोटोमुळे भिंतीची शोभा वाढते.
आजकाल घरच्या लहान मुलांनी तयार केलेले वॉलपिस किंवा चित्र भिंतीवर लावण्याचा ट्रेंड सुरु आहे. असे केल्याने या भिंतीला एक मायेची उब मिळते तसेच मुलांचाही उत्साह वाढतो.