Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मोनलीसा आणि राणू मंडल, दोघींची कथा विचित्र-एका रात्रीत स्टार-एका फटक्यात ट्रोलिंगची शिकार-चुकलं कुठं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2026 19:05 IST

1 / 6
कुंभमेळ्यात बिछडे मिले टाइप सिनेमे आपण पाहिले, पण कुंभमेळ्यात व्हायरल होऊन स्टार झालेली ती पहिलीच मोनालिसा. आता तिनं एका मुस्लिम तरुणाशी लग्न केलं, घरच्यांच्या विरोधात जाऊन हे लग्न केलं म्हणून तिच्यावर टिकेचा आगडोंबही उसळला आहे. एका रात्रीत स्टार, एका रात्रीत लोकप्रियता मातीमोल कशी होते याचं मोनालीसा हे एक उत्तम उदाहरण आहे.(Ranu Mondal and MonaLisa)
2 / 6
उत्तर प्रदेशातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी मोनालिसा. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात एका छायाचित्रकाराने मोनालिसाचा फोटो टिपला. साध्या माळा विकणारी ही टपोऱ्या डोळ्यांची मुलगी 'कुंभमेळ्यातील सुंदरी' म्हणून रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहचली. एका फोटोनं तिचं नशिब पालटलं. त्या कुंभमेळ्याचा चेहरा असल्यासारखी ती व्हायरल तर झालीच तिला सिनेमाच्या आणि मॉडेलिंगच्या ऑफर्सही येऊ लागल्या? (Viral star ani trolling)
3 / 6
पैसा प्रसिध्दी कुणाला नको असते? मोनालीसालाही का नको असेल? तिचा दणक्यात मेकओव्हर करण्यात आला. गांव की गोरी, स्टारच्या रुपात चमकू लागली. निरागस डोळ्यात आता महत्वाकांक्षा दिसू लागली. स्वप्न पाहणं वाईट नसतं, त्यात सोशल मीडिया स्टार असताना तेच माध्यम वापरुन रोज तिच्याविषयीच्या बातम्या ये जा करत होत्याच.
4 / 6
आणि आता बातमी आली की केरळात जाऊन तिनं एका मुस्लिम तरुणाशी लग्न केलं. तिच्या घरच्यांचा त्याला विरोध होता. लग्न हा तिचा व्यक्तिगत निर्णय पण ज्या सोशल मीडिया फॉलोअर्सनी तिला डोक्यावर घेतलं तेच आता धमक्या देत सुटले. तिचं सेलिब्रिटी स्टेटस पणाला लागलं.
5 / 6
सोशल मीडिया असता जितक्या वेगाने प्रसिद्धी देतो, तितक्याच वेगाने तो इतरांच्या खासगी आयुष्यातही ढवळाढवळ करतो. एक दिवस डोक्यावर दुसऱ्या दिवशी पायंदळी हे इथलं सूत्र. त्यामुळे स्टारडम किती खरं किती खोटं हा प्रश्न पडतोच. मोनालीसाचं तेच झालं. जिथं लाइक्सचे इमले बांधले गेले तिथंच आता ट्रोलिंगची खोल दरी वाट्याला आली.
6 / 6
मोनालीसा हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण राणू मंडलचं. एका रात्रीत स्टार, काही दिवसात गायब. माणसांच्या आयुष्यात खासगीपण उरत तर नाहीच पण जगजाहीर चारित्र्याची चिरफाड मात्र रोज होताना दिसते.
टॅग्स : सोशल व्हायरल