Join us

टॉयलेट सीट वारंवार घासण्याची गरजच नाही! घ्या सोपी युक्ती- टॉयलेटमधली दुर्गंधीही गायब होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 09:25 IST

1 / 7
टॉयलेट सीट स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी ते नेहमीच घासून स्वच्छ केलं जातं. यासाठी बरीच मेहनतही घ्यावी लागते..
2 / 7
आता तुम्हाला तुमच्या घरचं टॉयलेट सीट स्वच्छ ठेवण्यासाठी ते घासत बसण्याची आणि त्यासाठी जास्तीची मेहनत करण्याची काहीच गरज नाही. कारण ही एक सोपी युक्ती पाहा.. यामुळे वारंवार न घासताही टॉयलेट सीट अगदी स्वच्छ, चकाचक राहील.
3 / 7
हा उपाय करण्यासाठी एका ॲल्युमिनियम फॉईलचा तुकडा घ्या.
4 / 7
त्या तुकड्यावर एक चमचा बेकिंग सोडा घाला. बेकिंग सोड्यामुळे टॉयलेट सीटचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते.
5 / 7
यानंतर त्यावर साबणाचे अगदी बारीक बारीक तुकडे करून ठेवा.
6 / 7
तसेच दोन ते तीन चमचे टुथपेस्ट घाला. हे सगळं मिश्रण एकत्र करा आणि त्या ॲल्युमिनियम फॉईलचा एक गोळा तयार करा. या बॉलवर कात्रीने किंवा सेफ्टी पिनने बारीक बारीक छिद्रं पाडा आणि तो बॉल फ्लश टँकमध्ये लटकावून ठेवा.
7 / 7
या बॉलमधले पदार्थ टँकमधल्या पाण्यात मिसळले जातील आणि दरवेळी फ्लश करताना टॉयलेट सीट स्वच्छ होईल. टॉयलेटमधून येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठीही हा उपाय उत्तम आहे.
टॅग्स : सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी