किचन लहान असलं तरी दिसेल आलिशान! ७ बेस्ट कॅबिनेट डिझाइन्स - कमी जागेतही मिळेल जास्त स्टोरेज...

Updated:March 9, 2026 20:05 IST2026-03-09T20:00:20+5:302026-03-09T20:05:02+5:30

simple cabinet design for small kitchen : small kitchen cabinet design ideas : simple cabinet design ideas for small kitchen : छोट्याशा किचनसाठी आकर्षक कॅबिनेट डिझाइन्स, कमी जागेतही मावेल दुप्पट सामान...

किचन लहान असलं तरी दिसेल आलिशान! ७ बेस्ट कॅबिनेट डिझाइन्स - कमी जागेतही मिळेल जास्त स्टोरेज...

आजकाल बहुतेक घरांमध्ये किचनची जागा सर्वात लहान असते. त्यामुळे कमी जागेत जास्त वस्तू व्यवस्थित ठेवणे ही मोठी समस्या असते. अशावेळी किचनमधील कॅबिनेट्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य डिझाइनचे कॅबिनेट्स वापरल्यास केवळ (simple cabinet design for small kitchen) स्टोरेजच वाढत नाही, तर छोटंसं किचनही अधिक व्यवस्थित, सुंदर आणि आलिशान दिसू शकतं.

किचन लहान असलं तरी दिसेल आलिशान! ७ बेस्ट कॅबिनेट डिझाइन्स - कमी जागेतही मिळेल जास्त स्टोरेज...

लहान किचनमध्ये योग्य प्रकारचे कॅबिनेट डिझाइन्स निवडल्यास (simple cabinet design ideas for small kitchen) प्रत्येक कोपऱ्याचा योग्य वापर करता येतो. किचन कॅबिनेट्सच्या सारख्या स्मार्ट डिझाइन्समुळे कमी जागेतही भरपूर स्टोरेज तयार करता येते. त्यामुळे तुमचे किचन अधिक मोकळे, नीटनेटके आणि आकर्षक दिसू शकते. लहान किचनमध्येही सहज बसतील आणि तुमच्या किचनला स्टायलिश लूक देतील असे काही खास कॅबिनेट डिझाइन्स पाहूयात...

किचन लहान असलं तरी दिसेल आलिशान! ७ बेस्ट कॅबिनेट डिझाइन्स - कमी जागेतही मिळेल जास्त स्टोरेज...

हे कॅबिनेट्स स्लाइड करून बाहेर काढता येतात. त्यामुळे आत ठेवलेल्या वस्तू सहज दिसतात आणि काढताना त्रास होत नाही. मसाले, बाटल्या किंवा लहान भांडी ठेवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. या प्रकारच्या कॅबिनेट्समध्ये खास 'स्लायडर' बसवलेले असतात, ज्यामुळे ते अगदी सहज बाहेर ओढता येतात. जसे तुम्ही हे कॅबिनेट बाहेर खेचता, तसा आतील मोठा भाग बाहेर येतो, ज्यामुळे तुम्हाला वस्तू शोधणे सोपे जाते. यामध्ये तुम्ही भरपूर सामान व्यवस्थित ठेवू शकता. विशेषतः मसाल्याचे डबे, तेलाच्या बाटल्या, छोटे कंटेनर आणि अगदी ताटे ठेवण्यासाठीही यात स्वतंत्र जागा असते. कमी जागेत जास्तीत जास्त सामान साठवण्यासाठी हा लहान किचनसाठी सर्वात 'बेस्ट' पर्याय आहे.

किचन लहान असलं तरी दिसेल आलिशान! ७ बेस्ट कॅबिनेट डिझाइन्स - कमी जागेतही मिळेल जास्त स्टोरेज...

वर्टिकल स्टोरेज कॅबिनेट्स याची सर्वात मोठी खासियत म्हणजे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वस्तू साठवण्याचा पर्याय यात मिळतो. तुम्ही तुमच्या किचनमध्ये उंच आणि अरुंद 'वर्टिकल कॅबिनेट्स' बसवले, तर तुम्ही एकाच वेळी अनेक वस्तू व्यवस्थित ठेवू शकता. या डिझाइनमुळे किचनमधील उंचीचा (Height) वापर करण्याची संधी मिळते, जी एरवी वाया जाते. म्हणूनच लहान किचनसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय मानला जातो. अशा प्रकारचे कॅबिनेट्स तुमच्या किचनला केवळ प्रशस्तच बनवत नाहीत, तर एक अतिशय मॉर्डन आणि लक्झरी लूक देखील देतात. फ्लोअरपासून छतापर्यंत असलेले उंच कॅबिनेट्स लहान किचनसाठी खूप उपयोगी ठरतात.

किचन लहान असलं तरी दिसेल आलिशान! ७ बेस्ट कॅबिनेट डिझाइन्स - कमी जागेतही मिळेल जास्त स्टोरेज...

लहान जागेत कॅबिनेट्सना मोठी हँडल्स असल्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी 'पुश-टू-ओपन' किंवा 'प्रोफाईल हँडल' असलेले कॅबिनेट्स निवडा. हे डिझाइन दिसायला अतिशय मॉडर्न आणि साधे असते, ज्यामुळे किचनला मॉडर्न लूक मिळतो. तुम्ही ओट्याच्या खाली आणि ओट्याच्या वर भिंतीमध्ये हे कॅबिनेट्स फिट करू शकता, ज्यामुळे कमी जागेत जास्त सामान मावते. या डिझाइनचा एक मोठा फायदा म्हणजे, जर तुम्ही अगदी अरुंद किंवा पातळ कॅबिनेट्स बनवले, तरी ते दिसायला ओबडधोबड वाटत नाहीत. हँडल्स नसल्यामुळे सर्व कॅबिनेट्स एकसारखे आणि सलग दिसतात, ज्यामुळे किचनला एक 'स्मूथ' आणि आधुनिक लूक मिळतो.

किचन लहान असलं तरी दिसेल आलिशान! ७ बेस्ट कॅबिनेट डिझाइन्स - कमी जागेतही मिळेल जास्त स्टोरेज...

वरील सर्व पर्यायांपेक्षाही एक उत्तम पर्याय म्हणजे 'स्लायडर कॅबिनेट्स'. या कॅबिनेट्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे दरवाजे बाहेरच्या बाजूला उघडत नाहीत. त्यामुळे किचनमध्ये जागा कमी असली, तरी दरवाजे उघडताना होणारी अडचण येत नाही. हे दरवाजे बाजूला सरकवून स्लाईड करून उघडले जातात, त्यामुळे ते कमी जागेतही अतिशय सोयीस्कर ठरतात. यासाठी तुम्हाला खूप जास्त छोटे-छोटे कप्पे करण्याची गरज नाही. तुम्ही ३ ते ४ रांगांचे मोठे शेल्फ बनवू शकता आणि त्याच्या समोर एक 'स्लायडर' दरवाजा लावू शकता. यामुळे सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा मिळते आणि किचनचा लूकही अतिशय नीटनेटका व आधुनिक दिसतो.

किचन लहान असलं तरी दिसेल आलिशान! ७ बेस्ट कॅबिनेट डिझाइन्स - कमी जागेतही मिळेल जास्त स्टोरेज...

किचनमधील कोपरे अनेकदा रिकामे राहतात. कॉर्नर कॅबिनेट्स बसवल्यास या जागेचा योग्य वापर करता येतो. यामध्ये फिरणारे किंवा पुल-आउट प्रकारही असतात, जे वापरायला खूप सोपे असतात.

किचन लहान असलं तरी दिसेल आलिशान! ७ बेस्ट कॅबिनेट डिझाइन्स - कमी जागेतही मिळेल जास्त स्टोरेज...

लहान किचनमध्ये एकाच कॅबिनेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरेज तयार करता येते. उदाहरणार्थ, एका कॅबिनेटमध्ये ड्रॉअर, शेल्फ आणि स्लाइडिंग रॅक अशा अनेक सुविधा असू शकतात.

किचन लहान असलं तरी दिसेल आलिशान! ७ बेस्ट कॅबिनेट डिझाइन्स - कमी जागेतही मिळेल जास्त स्टोरेज...

सगळीकडे बंदिस्त लाकडी कॅबिनेट्स असल्यास किचन कोंदट वाटू शकते. अशा वेळी काही कॅबिनेट्सना काचेचे दरवाजे लावा किंवा काही कप्पे उघडे ठेवा. यामुळे किचनमध्ये मोकळेपणा जाणवतो आणि तुमच्या सुंदर क्रॉकरीचे प्रदर्शनही होते, जे एक 'लक्झरी' लूक देते.