शिवजयंती स्पेशल रांगोळी: झटपट काढता येणाऱ्या सोप्या रांगोळ्यांनी सजवा तुमचं घर आणि अंगण
Updated:February 19, 2025 12:02 IST2025-02-18T14:54:03+5:302025-02-19T12:02:59+5:30
Shiv Jayanti 2025 Simple Rangoli Designs:छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे शिवजयंतीचा सोहळा बुधवारी घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

शिवजयंतीचा सोहळा बुधवारी घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे (Shiv Jayanti 2025). यासाठी जर तुम्हाला घरासमोर आकर्षक रांगोळी काढायची असेल तर त्यासाठी पाहा काही साधे- सोपे आणि मुख्य म्हणजे झटपट होणारे रांगोळी डिझाईन्स..(Shiv Jayanti special rangoli designs)
ही रांगोळी अतिशय बोलकी आहे. दिसायला तुम्हाला अवघड वाटू शकते. पण एकदा काढायला बसलात की अगदी पटकन सुरेख रांगाेळी काढून होईल..
कमी वेळेत आणि कमी रंगांमध्ये काढून होणारी ही रांगोळी काढायलाही सोपी आहे.
साध्या, सोप्या आणि प्रसंगानुरूप असणाऱ्या रांगोळीचं हे आणखी एक खूप सुंदर उदाहरण आहे.
महाराजांचा जिरेटोप, भगवा झेंडा अशी ही रांगोळी बघताक्षणीच स्फुरण देणारी आहे.
अशा पद्धतीची रांगोळी काढून राजांच्या तलवारीचा दरारा तुमच्या कलाकृतीतून दाखवून देऊ शकता..
ही रांगोळीसुद्धा अतिशय सुंदर आहे. तिच्यामध्ये रंग खूप वेगळ्या पद्धतीने भरण्यात आले आहेत. त्यामुळे त्या रांगोलाही एकदम छान इफेक्ट येत आहे.