Join us   

१५ वर्षांनी एकदाच फुलतो जगातला सर्वात महागडा गुलाब; शंभर कोटी रुपयांना १ गुलाब, बघा त्याची खास बात..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 2:04 PM

1 / 8
गुलाब देऊन प्रेमाची कबुली देण्याची पद्धत पुर्वापार चालत आली आहे. दोन जोडप्यांच्या नात्यातील प्रेम व्यक्त करणाऱ्या गुलाबाच्या फुलाचं नात्यातलं महत्व अनन्य साधारण आहे. आतापर्यंत तुम्ही १० रूपयांपासून ते १०० रूपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची फुलं पाहिली असतील. (Most Expensive rose in the world)
2 / 8
वेगवेगळ्या रंगाची गुलाब नेहमीच लक्ष वेधून घेतात. त्यापैकीच एक म्हणजे द जूलियट रोज या गुलाबाची किंमत करोडो रुपये असते. या गुलाबाची किंमत खरंच करोडो रुपये असते. हे वाचून अनेकांना धक्का बसला आहे.
3 / 8
खूप मेहनतीनंतर उगवलेल्या या गुलाबाची लागवड पहिल्यांदाच रोझ ब्रीडर डेव्हिड ऑस्टिन यांनी केली आणि 2006 मध्ये पहिल्यांदाच या गुलाबाची पहिली झलक जगाला दाखवली. खास पद्धतीने वाढणाऱ्या 'द ज्युलिएट रोज'च्या गुलाबाची किंमत 112 कोटी रुपये आहे.
4 / 8
डेव्हिड ऑस्टिनने एक नाही तर अनेक प्रकारचे गुलाब मिसळून हा खास गुलाब तयार केला. यामुळे त्यांनी या खास प्रकारच्या गुलाबाचे नाव द ज्युलिएट रोज असे ठेवले.
5 / 8
या फुलाच्या लागवडीस १५ वर्षे लागतात आणि अंदाजे ५ दशलक्ष डॉलर्स जे भारतीय रुपयात अंदाजे ३७ कोटी रुपये आहेत. त्याला Apricot Hued Hybrid म्हणतात. हा खास गुलाब डेव्हिड ऑस्टिनने 2006 मध्ये 10 मिलियन पौंड म्हणजेच 90 कोटींना विकला होता.
6 / 8
सुंदर ज्युलिएट गुलाबचा सुगंध चहाच्या सौम्य सुगंधासारखा आणि परफ्यूमच्या सुगंधासारखा आहे. हा सुगंध बहुतेक लोकांना आवडला आहे. या गुलाबाच्या किंमतीचे कारण म्हणजे त्याचा सुगंध.
7 / 8
द ज्युलिएट रोज विकत घेणे ही प्रत्येकाच्या क्षमतेची बाब नसली तरी ज्युलिएट गुलाब खूप खास आहे, म्हणूनच त्याची किंमत इतर गुलांबाच्या तुलनेत हजारो-लाखांमध्ये नाही, तर कोटींमध्ये आहे.
8 / 8
(Image Credit- Social Media)
टॅग्स : व्हॅलेंटाईन वीक