Rohit Sharma Birthday : हिटमॅनला केले रितिकाने क्लिन बोल्ड ! शर्माजी के बेटे की प्यारवाली लव्हस्टोरी..
Updated:April 30, 2025 13:23 IST2025-04-30T13:19:08+5:302025-04-30T13:23:48+5:30
Rohit Sharma Birthday: Rohit Sharma's sweet love story : रोहित शर्माची लव्हस्टोरी अगदी सिनेमासारखीच. पाहा कोण कोणाला कुठे भेटलं.

भारतामध्ये क्रिकेट हा खेळ म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतीय खेळाडूंवर भारतीय जीवापाड प्रेम करतात. असाच एक फार लोकप्रिय खेळाडू म्हणजे भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा.
रोहित व त्याची पत्नी रितिका यांची जोडी फार प्रसिद्ध आहे. रोहित एक वडील म्हणून तसेच एक नवरा म्हणून फार गुणी आहे असे मत नेटकरी सतत व्यक्त करत असतात. रोहित व रितिकाची लव्ह स्टोरीही चित्रपटाच्या कथानकापेक्षा कमी नाही.
रितिका स्पोर्ट मॅनेजमेंटचे काम करते. रोहित व रितिकाची भेटा एका जाहिरातीच्या शुटींग वेळी झाली होती. त्यावेळी रोहित २० वर्षाचा होता. क्षेत्रात नवीन होता आणि रितिका युवराज सिंहला बहीणी समान आहे त्यामुळे रोहितने रितिकाशी बोलणेही टाळले होते.
शुटिंग सुरू होण्यापूर्वी युवराजने रोहितला माझ्या बहिणीच्या जवळ जायचं नाही असे ओरडून सांगितले. रोहितला त्यावेळी रितिकाचा रागही आला होता असे रोहिने सांगितले. मात्र काही वेळा नंतर रितिकाच रोहितशी गप्पा मारायला गेली आणि त्यांच्या मैत्रीला सुरवात झाली.
त्यानंतर कामा निमित्त रोहित रितिका भेटत राहिले. त्यांची मैत्री घट्ट होत गेली. रितिका युवराजची बहिण असल्याने रोहित व रितिका एकत्र फार राहायचे नाहीत. कामा निमित्तच भेटायचे. मात्र हळूहळू त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
जवळपास ६ वर्षांसाठी रोहित व रितिकाने त्यांचे नाते लपवून ठेवले होते. कोणाला साधी चाहुलही लागू दिली नाही. रोहितने बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये रितिकाला सगळ्यांसमोर लग्नासाठी मागणी घातली तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांना कळले.
रोहितने करियरची सुरवात ज्या स्पोर्ट्स क्लबमधून केली तिथूनच त्याच्या आयुष्यातील आणखी एका सुंदर गोष्टीची सुरवात त्याला करायची होती. रोहितच्या मागणीला रितिकाने लगेच होकार दिला.
१०१५ साली त्यांचे लग्न झाले. त्यांनी एक मुलगी आहे तसेच २०२४ मध्ये रोहितच्या कुटुंबामध्ये एका मुलाचे स्वागत त्यांनी केले. मुलीचे नाव समायरा असून मुलाचे नाव अहान ठेवले आहे.