1 / 7गणपती अगदी दोन दिवसावर आहेत. बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत काहीच कमी राहता कामा नये अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यामुळे पूर्व तयारी फार महत्त्वाची. बाप्पा घरी विराजमान होण्यासाठी जेव्हा येतात तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी दारात छान पाऊल काढायची पद्धत आहे. 2 / 7रंगीत पावलांची रांगोळी काढली जाते. ही पाऊले बाप्पाला घरी येण्यासाठी दिलेले आमंत्रण असतात. आनंदाने आमच्या घरी या आणि नांदा यासाठी ही पाऊले काढली जातात. छान सोप्या पद्धतीने पाऊलांची रांगोळी काढता येते. त्यासाठी खास डिझाइन पाहा. 3 / 7जर फार छान रांगोळी काढता येत नाही. तर मग ही रांगोळी नक्की काढून पाहा. एकदम सोपी आहे. 4 / 7दोन रंगांचा वापर करुन ही रांगोळी काढून पाहा, अगदी सुंदर दिसेल. पाच मिनिटांचे काम.5 / 7पाऊले काढून त्यात एखादा रंग भरायचा. असेही छान दिसते आणि घराच्या सगळ्या दारांसमोर काढता येते. 6 / 7पाऊलांचे छापेही मिळतात. त्यातून आवडत्या रंगाची पाऊले काढणे अगदीच सोपे आहे. फक्त जाळी उचलताना हलक्या हाताने उचलावी. 7 / 7विविध प्रकारे पाऊलांचे आकार काढता येतात. पिवळा पांढरा लाल रंग वापरता येतो. अगदी मस्त दिसेल आणि काढायला एकदम सोपी आहे.